Posts

Showing posts from February, 2020

जस्ट फॉरवर्ड इट

Image
ट्रेंड असतो.. सांगितलेलं वही वर उतरवायचे हा जसा एक ट्रेंड होता, किंवा आहे.. अगदी तसाच ट्रेंड.. आपल्याला किती समजलं किंवा आपण काय लिहीतोय ते समजून लिहितोय का? जे लिहितोय त्याचे पालन होणार आहे का? बरोबर लिहितोय की चूक? एक वाक्य एकदाच लिहिले गेलेय ना? परत लिहित असल्यास डबल लिहितोय हे तरी कळाले आहे काय? हे जसं वही वर उतरवितांना होत असेल तसेच आताही सोशल मिडीया वर शेयर करतांना होतय का? काळानुसार हातात शस्त्रे येत असतात. शिकत असतांना पेन असतो आणि डिजिटल युगात मोबाईल किंवा तत्सम यंत्र असतं. आता त्या वरुन स्क्रीन वर उतरवलेले फॉरवर्डेड मेसेजेस असतात. असे कित्येक मेसेजेस असतात ज्यांचे पाठवणारया व्यक्ती कडून पालन होणार नसते. अथवा पालन करायचे आहे हे त्यांच्या गावीही नसते. मग ते अगदी कोणतंही क्षेत्र असो. आपले विचार जुळवून न पाहताच पुढे पाठवण्याची उत्तम कला सोशल मीड़िया वर अंगारली गेलीये. PC-shutterstock.com आंदोलन, मोर्चे, स्वच्छता ई.ची माहिती मेसेजेस द्वारे पुरवली जाते. पण फक्त पुरवलीच जाते. वागवली जात नाही. शाळेतल्या प्रतिज्ञे सारखी.... ती शाळेसोबतच सोडल्या सारखं झालयं. सोशल मीड़िया वर होणाऱ्या...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी परवड

Image
शिक्षणाचं महत्व् लक्षात घेऊन ग्रामीण भागातील मुले मुली सुद्धा नुसते घर ओलांडून नव्हे तर गाव ओलांडून बाहेर पड़त आहेत. पण ह्या नव्या दुनियेची ओळख होत असताना खुप गोष्टींना सामोरे जावे लागते. हा प्रवास साधेपणा ते चंगळवाद असा पण होऊ शकतो. सुरुवात पुस्तके आणि इतर खर्च अशी असते. शिक्षण म्हटल्या वर खर्च आलाच. त्यात हल्लीच बाजारीकरण झालेल शिक्षण.. मग तर खुपच विषमता दिसून येते. भोवतालच्या वातावरणात पण खुप फरक पडतो. जसं की, भाषा, जीवनशैली इत्यादी तील बदल आढळतात. शिक्षण भाषा समजेल इतके उपयुक्त असतं पण त्याच संभाषण होईल ईतके कौशल्य अंगी येत नाही. बुद्धी, हुशारी सगळच असतं. पण शहरातच एकेंद्रीकरण झाल्याने सगळीकडची हुशारी बाहेर निघायला व्यासपीठ भेटत नाही. ग्रामीण भागातून आलेल्या मुलाला किंवा मुलीला अचानक शहरात आलं की गर्दी तर दिसू लागते आणि त्या गर्दीत आपले कुणी नाहिये असं पण वाटू लागतं. कॉलेज चा अर्थ शिकणं आणि त्या पलीकडच्या अनेक गोष्टी असं दिसायला लागतो. म्हणजे सुरुवातीचे काही दिवस नुसतं हवामानच नाही तर 'वातावरण' समजून घेण्यात जातात. काही फक्त अभ्यास करण्यात धन्यता मानतात, तर काही भपके ...

हिंसा आणि समाज

आपण वेगवेगळ्या धर्मातील लोकांची आपसात घडणारी हिंसा बघतो.. जेव्हा बाई वर ही वेळ येते तेव्हा प्रश्न पडतो म्हणजे तिचा सुद्धा एक धर्म बनवलाय का? जसं की, भावना दुखल्या की कर हिंसा.. पण ती तर खुप भावनाप्रधान आहे .ज्यांची मालकी सहन करत असते त्यांच्या भावना सहज समजून घेणारी..मग असं काय घडत की तिलाच फ़क्त समजून नाही घेतल जात आणि ती हिंसाचाराची शिकार बनते? निसर्गाने तिला दिलेल नाजूक शरीर कुणाची मक्तेदारी नाहिये. आता जरी अशी चित्रे कमी झालेली असली तरी नष्ट नाही झालीये. वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या कारणा वरुन तिची चाचणी केली जाते. एखादा संवेदनशील, सुंदर मुद्दा क्रौमार्य चाचणी साठी वापरला जाणे यासारखी हिंसा खचितच कुठे घडत असेल. घर असो की घरा बाहेर.. यापैकी एकही जागा सुरक्षित वाटू नये म्हणजे ही तथाकथित आधुनिक युगाची हार आहे. खाजगी ठिकाण असो की सार्वजनिक.. अनेक नजरा हिंस्त्र भासत असतात. हिंसा, बलात्कार, ॲसिड ॲटैक, ऑनर किलींग, विनयभंग, जबरदस्ती लाउन देण्यात आलेले विवाह अशा एक नाही हजार गोष्टी आहेत स्त्रीच खच्चीकरन करायला. पण जी नवीन जीव निर्माण करण्याची ताकद ठेवते ती अशी लगेच हारणारी नसते. जगभरात ...

आतला ज्ञानार्थी ओळखा.

शिक्षण ही खुप मौल्यवान गोष्ट आहे. देशाची बाजू कमकूवत करणारी महत्वाची गोष्ट शिक्षणपद्धती आहे. आपल्याकडे D.Ed, B.Ed ऑप्शन म्हणून केलं जातं. पण प्रगत समाजात शिक्षक होणं अवघड आणि तितकंच मानाचं आहे. खरंतर असलंच पाहिजे. कारण, शिक्षणा मूळे एक अख्खी पिढी घडणार असते. मात्र असं काहीही होत नाहीये. शिकवलेल्या किती गोष्टींच पालन केल जातं हे आत्मपरिक्षणातून दिसून येईल. व्यक्तिमत्व विकास, नागरिक शास्त्र, पर्यावरण यासारखे अनेक विषय एक सुजाण नागरिक होण्याचं स्वप्न आपल्याला दाखवत असतात आणि तरीही आपल्याला फ़क्त गलेलठ्ठ पगारासाठी शिकणे हेच वास्तवात आणायच असतं. ईथे घडणारा अधिकारी देखील नियम बाळगत नाही,डॉक्टर्स सेवा कमी अन् बाजाराच्या हॉस्पिटल मध्ये जास्त दिसतात, राजकारण आणि शिक्षण तर सवतीं प्रमाणे आहेत. शिक्षण हे एक मूल्य आहे, संपत्ती सारखं ते जोपासलं गेलं पाहिजे. आपलं राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष आहे-असं शाळेच्या पुस्तकाच्यापहिल्या पानापासून वाचत आलोय तरी स्वतःचाच धर्म मोठा ही बाहेरच्या शाळेतून मिळणारी शिकवणच सगळ्यात मह्त्वाची वाटते. एक माणूस घडवायला मूल्यशिक्षणाचा फार मोठा वाटा असतो. पण तो मार्क्स मिळवून देण...

लग्न कोणाचं निर्णय घेते कोण?

Image
मुलीने काय करावं? कस वागावं? कस रहावं? काय घालावं याचे निर्णय सुद्धा ती सोडून बाकीचे घेत असतात तेव्हा लग्ना सारखा संवेदनशील मुद्दा तरी याला कसा अपवाद असणार? मुलीच्या लग्ना चा विचार सुद्धा सार्वजनिक स्तरा वर केला जातो. स्टेटस, मानमरातब हे भाग असतात लग्नाचे. लग्न करणाऱ्याच्या इच्छा, त्या दोघांची मन, त्यांचे विचार हे खुंटी वर टांगले जातात. तिला लहान पासूनच समजूतदार, छोट्या गोष्टीत आनंद मानणारी अस शिकवल जात किंवा तसे टैग लावले जातात .म्हणजे अति महत्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा तिच्या ह्या ठरवलेल्या गुणांच् गुणगाण करता याव आणि त्या सोबत मनाच् विसर्जन झाल तरी काही सोयर सूतक नसणार. खरेतर निर्णय मुलगा असो वा मुलगी दोघांचे विचारात घेतले पाहिजे पण मुलीच्या वेळी प्रतिष्ठा आडवी येते कारण ती आयुष्यभर(?) सांभाळणार नसते. मुलाच म्हणन् विचारात घ्यावच लागत कारण तो आपला सांभाळ करणार अशी निदान आशा तरी ठेऊन असतात पालक. अर्थात मुलाच ऐकताना त्याच्या सोबत येणाऱ्या मुलीची ही चांगलीच गोची होत असते. सगळा विरोध पत्करुन ती हे लग्न करणार असते आणि अस न करणाऱ्या मुली आता उगीच खुश रहणार असतात . शेवटी तिच्या मुळे दो...

स्वच्छता आणि आपण

लहानपणा पासूनच घरी,शाळेत आपल्या कडून स्वच्छतेचे धड़े गिरवून घेतले जातात. पण पुढे जाऊन फ़क्त घर आणि स्वतःला स्वच्छ ठेवायचं लक्षात राहतं.. शाळा, कॉलेज आणि ईतर परिसर जसे आपले नाहीच असं त्या कड़े पाहिले जाते. चॉकलेटचे रैपर, ईतर कचरा, थुंकणे ह्या गोष्टी उघड्यावर झाल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्याच निसर्गावर अन् ओघानेच आपल्या शरीरावर होणार असतो ही समजूत सगळ्यांना यायला हवी. ईतर देशांचं नुसतंच कौतूक करून आपला आपल्या देशा बद्दलचा कळवळा दिसणार नसतो, तर खरोखर स्वच्छते चा भाग बनून आपली कर्तव्ये पार पाडायला हवी.सजीवांना चांगल्या हवेची गरज आहे आणि ती गरज आपणच पूर्ण करू शकतो. काही ठिकाणी सोयी सुविधांचा अभाव आहे पण जिथे कचराकुंडी उपलब्ध असेल तिथे तिचा वापर झालाच पाहिजे. हा विषय खूप रटाळ वाटतो काहींना पण खरंतर हा खूप गंभीर विषय आहे. सुंदर परीसर आपल्या सगळ्यांनाच हवाय त्या साठी न लाजता आपणच सुरुवात केली पाहिजे. धर्म, संस्कृती ह्या गोष्टीं बद्दल बोलताना पचकन थुंकून देशप्रेम दाखवण्यापेक्षा आपली कर्तव्ये पार पाडून ते दाखवावे. नुकताच जागतिक बँकेने आपल्याला विकसनशील देशांच्या यादीतून वगळलयं. स्वच्छतेच्...

आपल्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव दिसून येतो का?

Image
विज्ञान-हा जगताना अमंलात आणण्याचा विषय असला तरी फक्त शिक्षणासाठी वापरला जातोय. आयुष्य जगताना याच कितीही मोल असलं, तरी समाजात पाहिजे तितका वैज्ञानिक दृष्टिकोन नाही आलाय. नुसतचं मार्क्स मिळाले म्हणून विज्ञान शाखेला प्रवेश घेण्याची मानसिकता असणारे आपण विज्ञानवादी असू याची शक्यता तशी कमीच. आज पर्यंत एवढी प्रगती केलेल्या, दैनंदिन जीवनात आपल्याला दिशा देणाऱ्या वैज्ञानिकांचं खुप मोठ योगदान आहे. त्यांचा आदर्श घेऊन कुतूहल, जिज्ञासा हे गुण अंगी भिनवायला हवे. पण तसं होत नाहीये. आपल्याला सांगितलेल्या गोष्टींना हे अस का? याच कारण काय? असे प्रश्न न पड़ता जस आहे तस मानून घेण्याची सवय लागलीये. असा चिकित्सक वृत्तीचा अभाव 21 व्या शतकात तसा घातकच. PC- pixabay स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या राज्यात जर अंधश्रद्धा विरोधी कायदा बनवावा लागत असेल तर ह्या सारखी दुसरी शरमेची गोष्ट नसावी. सगळे दिवस सारखे असतात तरीही आमुक एक दिवस केस नाही कापायचे, तमुक एका वेळेला नख नाही कापायचे, गरोदर बाई ने ग्रहण नाही बघायचा इत्यादीं मागे असतील काही कारण तर त्यांच विश्लेषण पण झाल पाहिजे. नुसतच लादायला नको. आपण चुकीच्या गोष...

सोशल मीडियाचा व्हावा योग्य वापर

काट्याने काटा काढता येतो तसं विचारांची लढाई विचारांनी लढता येऊ शकते पण जेव्हा विचारच बोथट आणि पोकळ पडतात तेव्हा बदनामी सारखे शस्त्र हातात घेतली जातात . आजपर्यंत बऱ्याच व्यक्तीं सोबत हे घडलंय. स्वातंञ लढयातील सेनानींपासून ते आजपर्यंत लोकांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां पर्यंत अनेकजण या विकृती चे बळी ठरले आहेत. सोशल मीड़िया तर सोप्प् माध्यम आहे ..इथे कधी अतीरंजित लिहून तर कधी जुने फोटोज टाकून किंवा फोटोशॉप मध्ये फ़ोटो बनवून हवं ते अयोग्य लिहता येत आणि विरोध करुण फार मोठं काम केल्याच् समाधान मिळवता येत.. मग तो विरोध खोटा प्रसार करुण जरी होत असला तरी समोर आलेल्या गोष्टीची शहानिशा न करता पुढे पाठवण्याची सवय लागल्याने विकृतींच् अजूनच धकतं. प्रत्येकाची मत वेगळी असतात त्यांचा आदर जरी करता येत नसला तरी अनादर करणे थांबविले पाहिजे. विचार पटत नसला तर कुठे खुपतयं हे सांगायचं सोडून सरळ चरिञहनन केलं जातं. बदनामी ला बळी पडत असलेल्या व्यक्ती किती बरोबर किती चूक ह्याचा विचार नंतर करुया पण आपल्या अशा विकृत वागणुकीने आपण स्वतःच स्वतःच्या नजरेत काय चांगल बनणार असतो? की खरं खोट माहित...

सकारात्मक बदल

कसा असतो समाज .. एखाद्या घटका वर अन्याया ची व्यवस्था करतो. त्याच समाजातील ईतर कोणी त्या अन्याया विरुद्ध उभा राहतो. आपली समाजव्यवस्था स्त्री ला दुय्यम मानणारी का झाली असेल माहित नाही पण बदल तर होतच असतो .माणसाने निसर्गाला आव्हान द्यायला कमी नाही केलय तेव्हा ही तर त्याचीच व्यवस्था निर्मिती.अशा व्यवस्थेत जेव्हा बाई लाच तिच्या सोबतच्या वागणुकीची चीड़ येत नव्हती तेव्हा पासूनच काही सुज्ञ पुरुष तिच्या साठी उभे आहेत. काय काय प्रथा होत्या त्या.. बालविवाह,देवदासी,पडदा,घुंगट,सती ,फक्त चुल आणि मूल. पण सकारात्मकतेला दुष्काळ नसतो. एकाच समाजात लादणारे, आणि वाचा फोड़णारे असे दोन गट राहत असतात. वाचा फोडणाऱ्यांनी खुप काही झेललं. पण जगाला आदर्श दिला. काही स्त्रियांनी सुंदर उदाहरणं पुढे ठेवली-रझिया सुल्तान, संत मीराबाई, पंडित रमाबाई, बेगम हजरत महाल, सावित्री बाई फुले , राणी लक्ष्मी बाई इत्यादींनी न घाबरता परिस्थिती ला झुगारले. महात्मा फुले, राजा राम मोहन रॉय, ईश्वर चंद्र विद्यासागर इत्यादीं सारखे थोर पुरुष आपली प्रेरणा झाले. हा बदल खुप गरजेचा होता. मुलगी बाहेर पडत नव्हती. आई आणि सासू च्या तालिमीत मोठ...

तिला मिळणाऱ्या वाढीव संधी

निकी आणि श्रेयस दोघे एकाच कॉलेज मध्ये शिकणारे मित्र मैत्रीण . दोघेही सारखेच हुशार. कॉलेज च शेवटचं वर्ष सुरु झालं आणि जॉब शोधायची घाई सुरु झाली. Campus placement सोडून इतर ठिकाणाहून येणाऱ्या ऑफर्स का कुणास ठाऊक पण निकी ला जास्त येऊ लागल्या. आपल्या कड़े सामाजिक पातळी वर मुलगी कितीही दुर्लक्षित राहिली तरी वैयक्तिक पातळी वर ती heroine असते. आधी सारखं फारस बंधन कारक वातावरण मुलीला नसलं तरी ती approach करणार नाही ही खात्री असते म्हणूनच तिच्या कड़े येणाऱ्या संधी सुद्धा वाढीव असतात मला कोणत्या मानसिकतेलाला वाईट नाही ठरवायचयं पण प्रश्न पडलाय की आपण काही कारणासाठी मुलीला मदत करत असू आणि ती मात्र मी deserve करते ह्या आविर्भावात असायची..त्याने गैरसमज करुन घ्यावा आणि म्हणावं की मुली अशाच असतात. जाणीवच नाही ठेवत मदतीची.. मदतीची कारणे काहीही असोत पण तिच्या इतकीच् क्षमता असणारा मुलगा ह्या सर्वात मागे राहून जाण्याची शक्यता असते . ही फ़क्त एकच मानसिकता नाहिए . यात दुसरी पण बाजू आहे . संधी मिळतेय तर पोळी भाजून घेणारी मानसिकता . आपली क्षमता आणि आपल्या स्पर्धकाची क्षमता याचा विचारही न करणारी मानसिकता.....

ती@सोशल मीडिया

Image
खरंतर पृथ्वीच्या उत्पती पासून ती उभीए स्वतःचं अस्तित्त्व सांगत.. मानवाच्या जड़ण घडणीचा भाग बनत.. पण कालांतराने उद्याला आलेल्या धर्मांनी तिचे अस्तित्व नाकारले. मग सुरु झाला प्रवास पुन्हा स्वतःला शोधण्याचा.. या सर्वात ती कुठेच् मागे नाही राहिली, लढत राहिली.. आज मानवाने वैज्ञानिक क्रांती केली..जग जवळ आलं. Social media ने तर जादूच केलीए. विज्ञान कूणा एकाची मक्तेदारी नाही(म्हणून तिला इथे प्रवेश घेताना कुठल्याशा चौथरया सारखी परवानगी घ्यावी लागली नाही) . इथलं तीच जगण दुहेरी आहे. खऱ्या आयुष्यात सगळ समोर दिसत असताना आव्हानं असतात तसं इथे जे दिसतंय ते फ़क्त 'खरं मानून' पुढे चालावं लागतं. आपण फ़सू म्हणून ईथे रमायचंच नाही हा negative attitude झाला.. कारण या मुळे इथली positivity दुर्लक्षिली जाईल. ती मत मांडू शकते, ती उत्तरं देऊ शकते, ती जास्तीत जास्त explore करू शकते, बाहेर आलेल्या बंधनांनी social media वर स्वतंत्र वाट दिलीए. इथेही नेहमी सारखा सामना करावा लागला तर खुप भान बाळगून राहते ती.. inbox तर चौक असतो. एक hi म्हणजे एक शिट्टी वाटू लागते.(शेवटी प्रत्येक वेळी intention माहित नसतं)...

नोकरी आणि आपण

प्रगती, विकास ह्याचा विचार करावसं हल्ली कोणत्याच क्षेत्रातल्या प्रतिनिधींना वाटत नाहीये. फक्त सगळ्यात जास्त तरुणांचा देश असं ओरडत सांगून कोणी महासत्ता होणार नसतं. आणि का व्हायचयं महासत्ता? आपल्या लोकांना दोन वेळेच अन्न मिळून, त्यांच्या मुलभूत गरजा भागून सुखाने आयुष्य काढता यावे या सारखी ईतर कुठली सत्ता नसावी पण पैसा आणि त्या साठीची शर्यत यापुढे कोणालाच काही दिसत नाहीये. खुप मोठ्या मनुष्य बळाची आणि तांत्रिकतेची गरज आहे म्हणून लाखो engineers व्यवस्था निर्माण करतेय पण कंपन्याना काय हवयं याचा विचार न करता नुसतचं शिक्षणाचे धड़े गिरवले जाताय. शिक्षणाच्या बाजारात लाखो विद्यार्थ्यांच नुकसान होतयं. भरमसाठ फी आणि ईतर खर्चाने कावेबाजांचा व्यापार तर होतोय पण विदयार्थ्यांच्या भविष्याचं काय? असं कोणतं शिक्षण पुरवलं जातय ज्या मुळे तुमच्या criteria मध्ये मूलं/मुली बसत नाहिये? पदवी नंतर नोकरी मिळवून देऊ हा एक नवीन बाजार सुरु झालाय. कोणतही शिक्षण घ्या, बाहेर बाजारबुणगे आहेच त्यांचंच किती प्रभावी शस्त्र आहे याची जाहिरात करायला. शिक्षणपद्धती कडून समाधान होत नसल्याने पालक आणि विद्यार्थी सुद्धा बाजारात ...

दादरा नगर हवेली ची छोटी सहल

Image
   छोट्या प्रदेशांचं नेहमीच आकर्षण वाटतं. त्यात संघराज्यां बद्दल विशेष प्रेम वगैरे दाटून येतं. कारण, ते राज्यात का मोडत नाही हा कुतूहलाचा विषय राहिलाय. मग तिथली व्यवस्था, संस्कृती, भाषा, निसर्ग हे सगळं पाहण्याचा आणि समजून घेण्याचा मोह होतो. खरंतर, त्र्यंबकेश्र्वर पासूनच निसर्गाची बदलायला सुरुवात होते. तिथे चारा जमिनीवर साठवलेला नसतो, एकतर घराच्या छपरावर किंवा मोठ्या छत्री सारखं वरच्या भागावर टाकलेला होता.. थोडक्यात जनावरांसाठी किंवा सावली साठी अशी सोय असणार. रस्ते खूपच सुंदर , दुतर्फा हिरवाई असलेले आहेत. ग्रापंचायतींमध्ये प्रवेश केल्या केल्या ' गुडडा गुडडी' बोर्ड आहेत. ज्यात मुला मुलींची संख्या दर्शवलेली दिसते. दुधनी सरोवरात मधोमध बेटा सारखा डोंगर आहे. रस्त्यात उतरून त्याचा फोटो काढल्याशिवाय चैन पडली नाही .           विकिपीडियावर DNH मध्ये दोन कॉलेजेस असल्याचं म्हटलंय. एक गुजरात University कडे आणि एक पुणे University कडे. तसंच गुजराती, मराठी या दोन्ही भाषा बोलल्या जात असल्याचं म्हटलंय. खरंय, तिथे बरयाच जणांना हिंदी सकट या दोन्...

एका गाण्याची किंमत| Value of a song

Image
      एखादं गाणं आवडतं म्हणजे काय होतं? ते ऐकताना छान वाटतं? मन भावनिक होतं? की आणखी काही? शब्दांवर विशेष प्रेम जडलेलं असलं की, 'नझ्म नझ्म' सारखं गाणं चटकन आपल्या आवडीचं बनतं.. अशातच एकदिवस प्री wedding साठी हेच गाणं घ्यावं का असं फोटोग्राफर विचारतो.. नाही म्हणायचा संबंध येतच नाही.. आता लग्न होऊन दोन महिने होतील.. सुुजित ट्रेनिंगला गेलाय. त्याला बाय करणं तसं जडच, मग घरात आल्यानंतर बिल्डिंग मध्ये कोणीतरी हेेच गाणं मोठ्याने लावलं होतं. मला उगीचच भावनिक होण्यात अर्थ नाही असंही वाटलं पण असं वाटेेपर्यंत आनंद, जुन्या आठवणींना उजाळा, आणि त्या आठवणी दाटून आल्यावर फक्त लिहायला घेणं एवढा एकच पर्याय समोर शिल्लक दिसला. हे तर फक्त एक उदाहरण झालं. प्रत्येक प्रवास धिंगाणा घालणाऱ्या गाण्यांनी सुरू होतो, आणि त्याचा शेेेवट कसंही गाणं असलं तरी तो प्रवास संपू नये असं आपल्याला वाटून शांत करणारा असतो. एक गाणं इतकं महत्त्वपूर्ण ठरावं यासाठी किती लोकांचं योगदान त्या मागे असतं. गीतकारापासून, गायक ते संगीतकारापर्यंत... आजचा Arko, कालचे जावेद, लता, रफी साहब, उदित नारायण...