आपल्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव दिसून येतो का?


विज्ञान-हा जगताना अमंलात आणण्याचा विषय असला तरी फक्त शिक्षणासाठी वापरला जातोय. आयुष्य जगताना याच कितीही मोल असलं, तरी समाजात पाहिजे तितका वैज्ञानिक दृष्टिकोन नाही आलाय. नुसतचं मार्क्स मिळाले म्हणून विज्ञान शाखेला प्रवेश घेण्याची मानसिकता असणारे आपण विज्ञानवादी असू याची शक्यता तशी कमीच. आज पर्यंत एवढी प्रगती केलेल्या, दैनंदिन जीवनात आपल्याला दिशा देणाऱ्या वैज्ञानिकांचं खुप मोठ योगदान आहे. त्यांचा आदर्श घेऊन कुतूहल, जिज्ञासा हे गुण अंगी भिनवायला हवे. पण तसं होत नाहीये. आपल्याला सांगितलेल्या गोष्टींना हे अस का? याच कारण काय? असे प्रश्न न पड़ता जस आहे तस मानून घेण्याची सवय लागलीये. असा चिकित्सक वृत्तीचा अभाव 21 व्या शतकात तसा घातकच. PC- pixabay स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या राज्यात जर अंधश्रद्धा विरोधी कायदा बनवावा लागत असेल तर ह्या सारखी दुसरी शरमेची गोष्ट नसावी. सगळे दिवस सारखे असतात तरीही आमुक एक दिवस केस नाही कापायचे, तमुक एका वेळेला नख नाही कापायचे, गरोदर बाई ने ग्रहण नाही बघायचा इत्यादीं मागे असतील काही कारण तर त्यांच विश्लेषण पण झाल पाहिजे. नुसतच लादायला नको. आपण चुकीच्या गोष्टी पसरत असताना त्या संदर्भात बुदध्यांक वापरला पाहिजे. देवासंबधी श्रद्धा आणि भावनांच भांडवल केल जाऊन, विज्ञान फाट्यावर मारल जात.शरीराच्या नैसर्गिक क्रियांचा आणि देवाचा संबंध येउच कसा शकतो .. जर संबंध येत असेल तर शिक्षण घेण सोडून दयायला हवं. कारण फ़क्त नोकरी करण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी शिकायचं नसत तर शिकून वैचारिक क्षमता सुद्धा आत्मसात करावी लागते. ह्या छोट्या गोष्टी कळाल्या नाही तर तथाकथित विज्ञान युगाची ही हार आहे. डॉ नरेंद्र दाभोळकरां सारख्या विज्ञानवादी माणसाला संपवायला सुद्धा विज्ञानाच्या सहाय्याने बनवलेली बंदूकच वापरावी लागली हे विसरून चालणार नाही. विज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेल्या सोशल मीडिया वर अंधश्रद्धायुक्त गोष्टी पसरवल्या जातात ह्या सारखी शोकांतिका कुठे नसेल. शेवटी रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर ,अब्दुल कलाम, सी व्ही रमन ,डॉ होमी भाभा ईत्यादी वैज्ञानिकां मुळे देशाला ज्ञानाची कमी नाहिये. कमी आहे ती फ़क्त विज्ञानवादी दृष्टिकोणाची.. विज्ञानाची कास धरूया.. स्वतः ला सिद्ध करुया

Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine