सोशल मीडियाचा व्हावा योग्य वापर


काट्याने काटा काढता येतो तसं विचारांची लढाई विचारांनी लढता येऊ शकते पण जेव्हा विचारच बोथट आणि पोकळ पडतात तेव्हा बदनामी सारखे शस्त्र हातात घेतली जातात . आजपर्यंत बऱ्याच व्यक्तीं सोबत हे घडलंय. स्वातंञ लढयातील सेनानींपासून ते आजपर्यंत लोकांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां पर्यंत अनेकजण या विकृती चे बळी ठरले आहेत. सोशल मीड़िया तर सोप्प् माध्यम आहे ..इथे कधी अतीरंजित लिहून तर कधी जुने फोटोज टाकून किंवा फोटोशॉप मध्ये फ़ोटो बनवून हवं ते अयोग्य लिहता येत आणि विरोध करुण फार मोठं काम केल्याच् समाधान मिळवता येत.. मग तो विरोध खोटा प्रसार करुण जरी होत असला तरी समोर आलेल्या गोष्टीची शहानिशा न करता पुढे पाठवण्याची सवय लागल्याने विकृतींच् अजूनच धकतं. प्रत्येकाची मत वेगळी असतात त्यांचा आदर जरी करता येत नसला तरी अनादर करणे थांबविले पाहिजे. विचार पटत नसला तर कुठे खुपतयं हे सांगायचं सोडून सरळ चरिञहनन केलं जातं. बदनामी ला बळी पडत असलेल्या व्यक्ती किती बरोबर किती चूक ह्याचा विचार नंतर करुया पण आपल्या अशा विकृत वागणुकीने आपण स्वतःच स्वतःच्या नजरेत काय चांगल बनणार असतो? की खरं खोट माहित न करुण घेणाऱ्यांना येड्यात काढल्याच् समाधान मिळतं? परंतु हा विरोधक स्वभाव एक गफलत करत असतो.. एखादी कृती जी नकोशी झालीये ती समाजाच भल करणारी ठरु शकते आणि त्या समाजात आपण पण येतो हेही विसरून जातो हा स्वभाव. अर्थात एवढा विचार केला तर हे सगळ बोलण्याची वेळच नसती आली

Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine