सकारात्मक बदल


कसा असतो समाज .. एखाद्या घटका वर अन्याया ची व्यवस्था करतो. त्याच समाजातील ईतर कोणी त्या अन्याया विरुद्ध उभा राहतो. आपली समाजव्यवस्था स्त्री ला दुय्यम मानणारी का झाली असेल माहित नाही पण बदल तर होतच असतो .माणसाने निसर्गाला आव्हान द्यायला कमी नाही केलय तेव्हा ही तर त्याचीच व्यवस्था निर्मिती.अशा व्यवस्थेत जेव्हा बाई लाच तिच्या सोबतच्या वागणुकीची चीड़ येत नव्हती तेव्हा पासूनच काही सुज्ञ पुरुष तिच्या साठी उभे आहेत. काय काय प्रथा होत्या त्या.. बालविवाह,देवदासी,पडदा,घुंगट,सती ,फक्त चुल आणि मूल. पण सकारात्मकतेला दुष्काळ नसतो. एकाच समाजात लादणारे, आणि वाचा फोड़णारे असे दोन गट राहत असतात. वाचा फोडणाऱ्यांनी खुप काही झेललं. पण जगाला आदर्श दिला. काही स्त्रियांनी सुंदर उदाहरणं पुढे ठेवली-रझिया सुल्तान, संत मीराबाई, पंडित रमाबाई, बेगम हजरत महाल, सावित्री बाई फुले , राणी लक्ष्मी बाई इत्यादींनी न घाबरता परिस्थिती ला झुगारले. महात्मा फुले, राजा राम मोहन रॉय, ईश्वर चंद्र विद्यासागर इत्यादीं सारखे थोर पुरुष आपली प्रेरणा झाले. हा बदल खुप गरजेचा होता. मुलगी बाहेर पडत नव्हती. आई आणि सासू च्या तालिमीत मोठी होत राहिली . जग रहाटी पासून दूर रहायची. मग नंतर जेव्हा शिकू लागली तेव्हा ही काही मर्यादा पाळूनच. उंबरठा मनाच्या आणि ज्ञानाच्या आड़ येत असावा. तू थांब आई सोबत, त्याला जाउदे बाबा सोबत ह्या गोष्टी बाहेरच्या सामान्य ज्ञानात भर पाडायला कारणीभूत असतात. उगीच नाही राजकारण, खेळ यातल्या तिच्या सामान्य ज्ञाना वर विनोद होत. उगीच नाही मुलांना स्वयंपाक गृह घरा पासून लांब भासत. खूप बदल घडले तसे अजून ही खूप घडायचेय. आता स्त्री स्वतः तयार आहे बदलाचा भाग बनायला. तिची होणारी प्रगती ह्याची साक्ष आहे. समानतेची दोघांना कळणारी किंमत ह्याचं संकेत आहे. बदल खूप गरजेची प्रक्रिया आहे पण प्रत्येक वेळी मसीहा नको शोधायला. शिकून मोठ होऊन लादलेल्या विचारांना छोट करायचंय. समोर आलेल्या विचारावर हे असं का? ह्याचं समर्पक उत्तर आल्या शिवाय त्याचा अंगीकार नको व्हायला. शून्य क्षेत्र ते आता गाठायची बाक़ी असलेली शून्य क्षेत्रे हया प्रवासाच अंतिम स्थान खुप सुंदर आहे. बदल घड़वायला आधी जास्तीत जास्त विरोध होत होता आणि आता जास्तीत जास्त पाठिंबा मिळतोय. ह्या पाठिंब्यानेच उरलेल्या वाईट रीतीं वर विजय मिळवायचाय. अनंत सकारात्मकता घडवून आदर्श समाज निर्मितीचे आपण घटक बनायला हवे.

Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine