एका गाण्याची किंमत| Value of a song


      एखादं गाणं आवडतं म्हणजे काय होतं? ते ऐकताना छान वाटतं? मन भावनिक होतं? की आणखी काही? शब्दांवर विशेष प्रेम जडलेलं असलं की, 'नझ्म नझ्म' सारखं गाणं चटकन आपल्या आवडीचं बनतं.. अशातच एकदिवस प्री wedding साठी हेच गाणं घ्यावं का असं फोटोग्राफर विचारतो.. नाही म्हणायचा संबंध येतच नाही.. आता लग्न होऊन दोन महिने होतील.. सुुजित ट्रेनिंगला गेलाय. त्याला बाय करणं तसं जडच, मग घरात आल्यानंतर बिल्डिंग मध्ये कोणीतरी हेेच गाणं मोठ्याने लावलं होतं. मला उगीचच भावनिक होण्यात अर्थ नाही असंही वाटलं पण असं वाटेेपर्यंत आनंद, जुन्या आठवणींना उजाळा, आणि त्या आठवणी दाटून आल्यावर फक्त लिहायला घेणं एवढा एकच पर्याय समोर शिल्लक दिसला. हे तर फक्त एक उदाहरण झालं. प्रत्येक प्रवास धिंगाणा घालणाऱ्या गाण्यांनी सुरू होतो, आणि त्याचा शेेेवट कसंही गाणं असलं तरी तो प्रवास संपू नये असं आपल्याला वाटून शांत करणारा असतो. एक गाणं इतकं महत्त्वपूर्ण ठरावं यासाठी किती लोकांचं योगदान त्या मागे असतं. गीतकारापासून, गायक ते संगीतकारापर्यंत... आजचा Arko, कालचे जावेद, लता, रफी साहब, उदित नारायण ते श्रेेेया, मोनाली, आतिफ, अरिजीत, अजय, शफाकत अली अशी एक ना अनेक नावं.. प्रत्येकच क्षण जगायला मागे एक गाणं वाजत असतं..          

        कुुुठेे एक गाणं कानी पडलं आणि मी आजवर आवडलेली सगळी गाणी आठवून हे लिहायला घेतलं. हिच का ती गाण्यातली ताकद? जी आपल्याला सगळं सोडून असं बेभान व्हायला लावते.. हिच असेल ना आपल्या आयुष्यातील गाण्याची किंमत जी संपूर्ण जगाला शब्द आणि सूर एक साथ जगायला शिकवते..

Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine