ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी परवड


शिक्षणाचं महत्व् लक्षात घेऊन ग्रामीण भागातील मुले मुली सुद्धा नुसते घर ओलांडून नव्हे तर गाव ओलांडून बाहेर पड़त आहेत. पण ह्या नव्या दुनियेची ओळख होत असताना खुप गोष्टींना सामोरे जावे लागते. हा प्रवास साधेपणा ते चंगळवाद असा पण होऊ शकतो. सुरुवात पुस्तके आणि इतर खर्च अशी असते. शिक्षण म्हटल्या वर खर्च आलाच. त्यात हल्लीच बाजारीकरण झालेल शिक्षण.. मग तर खुपच विषमता दिसून येते. भोवतालच्या वातावरणात पण खुप फरक पडतो. जसं की, भाषा, जीवनशैली इत्यादी तील बदल आढळतात. शिक्षण भाषा समजेल इतके उपयुक्त असतं पण त्याच संभाषण होईल ईतके कौशल्य अंगी येत नाही. बुद्धी, हुशारी सगळच असतं. पण शहरातच एकेंद्रीकरण झाल्याने सगळीकडची हुशारी बाहेर निघायला व्यासपीठ भेटत नाही. ग्रामीण भागातून आलेल्या मुलाला किंवा मुलीला अचानक शहरात आलं की गर्दी तर दिसू लागते आणि त्या गर्दीत आपले कुणी नाहिये असं पण वाटू लागतं. कॉलेज चा अर्थ शिकणं आणि त्या पलीकडच्या अनेक गोष्टी असं दिसायला लागतो. म्हणजे सुरुवातीचे काही दिवस नुसतं हवामानच नाही तर 'वातावरण' समजून घेण्यात जातात. काही फक्त अभ्यास करण्यात धन्यता मानतात, तर काही भपके बाजीला बळी पडतात. काही मुला मुलींना दोघांचीही सांगड घालायला जमते. अचानक निसर्गाच्या सानिध्यात रहायची सवय सोडून बंगले, गाड्या यांचा सहवास सुरु होतो. बौद्धिक, भौतिक सगळेच बदल स्विकारण्याची ताकद अंगी बाणावी लागते. थोडक्यात, स्वतःत योग्य ते बदल करून, शैक्षणिक प्रगती घडवून, ग्रामीण भागातील मुले, मुली विकासाची फक्त शहराशी संबंधित असलेली संकल्पना आता बदलणार. PC- pixabay

Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine