दादरा नगर हवेली ची छोटी सहल
छोट्या प्रदेशांचं नेहमीच आकर्षण वाटतं. त्यात संघराज्यां बद्दल विशेष प्रेम वगैरे दाटून येतं. कारण, ते राज्यात का मोडत नाही हा कुतूहलाचा विषय राहिलाय. मग तिथली व्यवस्था, संस्कृती, भाषा, निसर्ग हे सगळं पाहण्याचा आणि समजून घेण्याचा मोह होतो. खरंतर, त्र्यंबकेश्र्वर पासूनच निसर्गाची बदलायला सुरुवात होते. तिथे चारा जमिनीवर साठवलेला नसतो, एकतर घराच्या छपरावर किंवा मोठ्या छत्री सारखं वरच्या भागावर टाकलेला होता..
थोडक्यात जनावरांसाठी किंवा सावली साठी अशी सोय असणार. रस्ते खूपच सुंदर , दुतर्फा हिरवाई असलेले आहेत. ग्रापंचायतींमध्ये प्रवेश केल्या केल्या ' गुडडा गुडडी' बोर्ड आहेत. ज्यात मुला मुलींची संख्या दर्शवलेली दिसते. दुधनी सरोवरात मधोमध बेटा सारखा डोंगर आहे. रस्त्यात उतरून त्याचा फोटो काढल्याशिवाय चैन पडली नाही
.
विकिपीडियावर DNH मध्ये दोन कॉलेजेस असल्याचं म्हटलंय. एक गुजरात University कडे आणि एक पुणे University कडे. तसंच गुजराती, मराठी या दोन्ही भाषा बोलल्या जात असल्याचं म्हटलंय. खरंय, तिथे बरयाच जणांना हिंदी सकट या दोन्ही भाषा आत्मसात आहेत.हेच असावं ते, UT चं राज्या पासूनचं वैविध्य.. दुधनीला शिकारा बोटीत बसल्यावर रफींचं 'ये चांद सा रोशन चेहरा' आठवलं. पण आमचे रफी असे गाणे म्हणत नसले तरी फोटो काढून दिले यातच आम्ही धन्य झालो. इन शॉर्ट, धिस शाॅर्ट ट्रीप वाॅज सो कुल.
Comments
Post a Comment