खरंतर पृथ्वीच्या उत्पती पासून ती उभीए स्वतःचं अस्तित्त्व सांगत.. मानवाच्या जड़ण घडणीचा भाग बनत..
पण कालांतराने उद्याला आलेल्या धर्मांनी तिचे अस्तित्व नाकारले. मग सुरु झाला प्रवास पुन्हा स्वतःला शोधण्याचा.. या सर्वात ती कुठेच् मागे नाही राहिली, लढत राहिली..
आज मानवाने वैज्ञानिक क्रांती केली..जग जवळ आलं. Social media ने तर जादूच केलीए. विज्ञान कूणा एकाची मक्तेदारी नाही(म्हणून तिला इथे प्रवेश घेताना कुठल्याशा चौथरया सारखी परवानगी घ्यावी लागली नाही) .
इथलं तीच जगण दुहेरी आहे.
खऱ्या आयुष्यात सगळ समोर दिसत असताना आव्हानं असतात तसं इथे जे दिसतंय ते फ़क्त 'खरं मानून' पुढे चालावं लागतं. आपण फ़सू म्हणून ईथे रमायचंच नाही हा negative attitude झाला.. कारण या मुळे इथली positivity दुर्लक्षिली जाईल. ती मत मांडू शकते, ती उत्तरं देऊ शकते, ती जास्तीत जास्त explore करू शकते, बाहेर आलेल्या बंधनांनी social media वर स्वतंत्र वाट दिलीए.
इथेही नेहमी सारखा सामना करावा लागला तर खुप भान बाळगून राहते ती.. inbox तर चौक असतो. एक hi म्हणजे एक शिट्टी वाटू लागते.(शेवटी प्रत्येक वेळी intention माहित नसतं)
. मग कधी कधी identity लपवून व्यक्त व्हावे लागते.
भान ठेऊन वावरल्याने योग्य सम विचारी लोकांशी मैत्री झाल्यावर आपण एकटे नसल्याची जाणीव होते आणि आत्मविश्वास उंचावलेला असतो. तिच्यातल्या वागण्याला असलेला मोकळीकतेचा अभाव आपल्या सारख्याच अनेक भेटल्यावर थोडा थोडा नाहिसा होऊ लागतो.
ती आशा ठेऊन असते की किती दिवस भान तिला ठेवायचयं? तो कधी ठेवणार? कधी तिला safe वाटणार..
आणि मग चालूच राहतो इथला प्रवास.. मजेशीर पण घाबरत, थोडा जपत, थोडा पुढे जात..थोडा कुतूहलात, थोडा स्विकारण्यात, जग पाहण्यात आणि कधीच न थांबण्यात.. आता ती अधिक सोशल होणार.. अधिक विचार करून आणि तरीही मोकळी जगणार..

PC-steemit.com
Comments
Post a Comment