तिला मिळणाऱ्या वाढीव संधी


निकी आणि श्रेयस दोघे एकाच कॉलेज मध्ये शिकणारे मित्र मैत्रीण . दोघेही सारखेच हुशार. कॉलेज च शेवटचं वर्ष सुरु झालं आणि जॉब शोधायची घाई सुरु झाली. Campus placement सोडून इतर ठिकाणाहून येणाऱ्या ऑफर्स का कुणास ठाऊक पण निकी ला जास्त येऊ लागल्या. आपल्या कड़े सामाजिक पातळी वर मुलगी कितीही दुर्लक्षित राहिली तरी वैयक्तिक पातळी वर ती heroine असते. आधी सारखं फारस बंधन कारक वातावरण मुलीला नसलं तरी ती approach करणार नाही ही खात्री असते म्हणूनच तिच्या कड़े येणाऱ्या संधी सुद्धा वाढीव असतात मला कोणत्या मानसिकतेलाला वाईट नाही ठरवायचयं पण प्रश्न पडलाय की आपण काही कारणासाठी मुलीला मदत करत असू आणि ती मात्र मी deserve करते ह्या आविर्भावात असायची..त्याने गैरसमज करुन घ्यावा आणि म्हणावं की मुली अशाच असतात. जाणीवच नाही ठेवत मदतीची.. मदतीची कारणे काहीही असोत पण तिच्या इतकीच् क्षमता असणारा मुलगा ह्या सर्वात मागे राहून जाण्याची शक्यता असते . ही फ़क्त एकच मानसिकता नाहिए . यात दुसरी पण बाजू आहे . संधी मिळतेय तर पोळी भाजून घेणारी मानसिकता . आपली क्षमता आणि आपल्या स्पर्धकाची क्षमता याचा विचारही न करणारी मानसिकता.. समानता म्हणत म्हणत discrimination वाढायला नको. आपल्याला दोघांना समान संधी द्यायच्या आहेत आणि त्यातून योग्य ते निवडायचं आहे. हे मुलामुलीतले समज गैरसमज येणाऱ्या पिढीत तरी मिटायला हवेत.

Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine