मुलीने काय करावं? कस वागावं? कस रहावं? काय घालावं याचे निर्णय सुद्धा ती सोडून बाकीचे घेत असतात तेव्हा लग्ना सारखा संवेदनशील मुद्दा तरी याला कसा अपवाद असणार?
मुलीच्या लग्ना चा विचार सुद्धा सार्वजनिक स्तरा वर केला जातो.
स्टेटस, मानमरातब हे भाग असतात लग्नाचे. लग्न करणाऱ्याच्या इच्छा, त्या दोघांची मन, त्यांचे विचार हे खुंटी वर टांगले जातात.
तिला लहान पासूनच समजूतदार, छोट्या गोष्टीत आनंद मानणारी अस शिकवल जात किंवा तसे टैग लावले जातात .म्हणजे अति महत्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा तिच्या ह्या ठरवलेल्या गुणांच् गुणगाण करता याव आणि त्या सोबत मनाच् विसर्जन झाल तरी काही सोयर सूतक नसणार.
खरेतर निर्णय मुलगा असो वा मुलगी दोघांचे विचारात घेतले पाहिजे पण मुलीच्या वेळी प्रतिष्ठा आडवी येते कारण ती आयुष्यभर(?) सांभाळणार नसते. मुलाच म्हणन् विचारात घ्यावच लागत कारण तो आपला सांभाळ करणार अशी निदान आशा तरी ठेऊन असतात पालक. अर्थात मुलाच ऐकताना त्याच्या सोबत येणाऱ्या मुलीची ही चांगलीच गोची होत असते. सगळा विरोध पत्करुन ती हे लग्न करणार असते आणि अस न करणाऱ्या मुली आता उगीच खुश रहणार असतात . शेवटी तिच्या मुळे दोन्ही घरांचं घरपण असतं.
जर एका व्यक्तीच्या भावनिक आधारावर घराचा आनंद ठरणार असतो तर आपण का तिला त्याग करायला भाग पाडतो? का तिच्या मना ऐवजी समाजाचा विचार केला जात असेल? शेवटी जोड़ीदारांचे निर्णय, त्यांचे आयुष्य यावर कुटुंब बनतं आणि समाज तर कुटुंबांचाच भाग असतो मग समाजाच्या चांगल्या साठीच खोटी प्रतिष्ठा असलेल्या समाजाचा विचार सोडून द्यावा लागेल अस म्हणायची वेळ आलीये.

PC- Google
Comments
Post a Comment