ट्रेंड असतो.. सांगितलेलं वही वर उतरवायचे हा जसा एक ट्रेंड होता, किंवा आहे.. अगदी तसाच ट्रेंड..
आपल्याला किती समजलं किंवा आपण काय लिहीतोय ते समजून लिहितोय का? जे लिहितोय त्याचे पालन होणार आहे का? बरोबर लिहितोय की चूक? एक वाक्य एकदाच लिहिले गेलेय ना? परत लिहित असल्यास डबल लिहितोय हे तरी कळाले आहे काय? हे जसं वही वर उतरवितांना होत असेल तसेच आताही सोशल मिडीया वर शेयर करतांना होतय का?
काळानुसार हातात शस्त्रे येत असतात. शिकत असतांना पेन असतो आणि डिजिटल युगात मोबाईल किंवा तत्सम यंत्र असतं. आता त्या वरुन स्क्रीन वर उतरवलेले फॉरवर्डेड मेसेजेस असतात. असे कित्येक मेसेजेस असतात ज्यांचे पाठवणारया व्यक्ती कडून पालन होणार नसते. अथवा पालन करायचे आहे हे त्यांच्या गावीही नसते. मग ते अगदी कोणतंही क्षेत्र असो. आपले विचार जुळवून न पाहताच पुढे पाठवण्याची उत्तम कला सोशल मीड़िया वर अंगारली गेलीये.

PC-shutterstock.com
आंदोलन, मोर्चे, स्वच्छता ई.ची माहिती मेसेजेस द्वारे पुरवली जाते. पण फक्त पुरवलीच जाते. वागवली जात नाही. शाळेतल्या प्रतिज्ञे सारखी.... ती शाळेसोबतच सोडल्या सारखं झालयं. सोशल मीड़िया वर होणाऱ्या शेयरिंगचे पण तसेच झालेय. सेंड बटन दाबल्यावर त्यातील कंटेंट सुद्धा डोक्यातून आणि मनातून दुसरीकडे सेंड होतो.
आपल्याला डिजिटल व्हायचयं.. वायफळ नाही.. हे सुद्धा सांगावं लागत जेव्हा इतक्या इतक्या लोकांना पाठवा आणि नशीब आजमवा असं वाचायला मिळतं. नामांकित संस्थांची मुख्य कामे व त्यांनी लावलेले (खरेतर फॉरवर्ड करण्यासाठी लावलेले) शोध वाचून तिथे काम करणाऱ्या तज्ञांबद्दल वाईट वाटतं आणि असं शेयर करणार्यांची कीव येते. फ़ोटो शॉप मधून पाण्यात, झाडावर वेगवेगळे आकार आणि महापुरुष दिसू लागतात तेव्हा फोटोशॉपचा शोध लावणारा महापुरुष स्वतःच्या शोधा बद्दल काय विचार करत असेल असा विचारही मनाला शिवून जातो..
घरात कसंही वागणं असलं तरीही नात्यांवर मोठे निबंध येतात, सकाळी सकाळी सुविचार वाचून गद्गदायला होतं की एवढी सुज्ञता आहे मग समाजात बिघडतयं कुठे?
कदाचित हा पण ट्रेंडच असावा.. जस्ट फॉरवर्ड..
Comments
Post a Comment