साद
"सृजन, .....!!" किती वेळ झाला होता. बाळाने लाथच मारली नव्हती. मी हाक मारली तशी हलकीच हालचाल जाणवली. ह्या हाकेवर अख्खं आयुष्य काढतो, आपण सजीव. कधी हाकेची वाट पाहत, कधी हाकेला साद देत, कधी स्वतः हाक मारत. आपण अशीच हाक मनाची ऐकतो का? प्रत्येक वेळी जोराने साद घालणे, म्हणजे हाक नव्हे. स्वतः च्या मनाचं ऐकून त्यावर उत्तर मिळवणं ही सुद्धा हाक आणि त्यावरील प्रतिक्रिया आहे. 'लव आज कल' या सिनेमात मीरा आणि जय एकमेकांना समोरासमोर किंवा फोनवर अशी कोणतीच हाक मारत नाही. पण ज्या क्षणी आपले निर्णय चुकले आहेत, ही जाणिव त्या दोघांनाही होते तेव्हा त्यांच्या मनाने घातलेली साद ते ऐकतात. 'रे कबीरा मान जा..' मध्ये इतकी आर्त हाक मारलीय, ती ऐकणं भागच होतं. मनाला कधी कधी सगळीकडून साद आलेली देखील समजत नाही. तेव्हा ऐक ना असं पोटतिडकीने म्हणावंच लागतं. अमिताभ भट्टाचार्य यांनी भूतकाळातल्या गोष्टी पण कशा बोलावू शकतात हे इतकं सुंदर मांडलंय - "टूटी चारपाई वोही, ठंडी पुरवाई रास्ता देखेss दूधों की मलाई वोही, मिट्टी की सुराही रस्ता देखेss.....