आपण वेगवेगळ्या धर्मातील लोकांची आपसात घडणारी हिंसा बघतो.. जेव्हा बाई वर ही वेळ येते तेव्हा प्रश्न पडतो म्हणजे तिचा सुद्धा एक धर्म बनवलाय का? जसं की, भावना दुखल्या की कर हिंसा.. पण ती तर खुप भावनाप्रधान आहे .ज्यांची मालकी सहन करत असते त्यांच्या भावना सहज समजून घेणारी..मग असं काय घडत की तिलाच फ़क्त समजून नाही घेतल जात आणि ती हिंसाचाराची शिकार बनते?
निसर्गाने तिला दिलेल नाजूक शरीर कुणाची मक्तेदारी नाहिये. आता जरी अशी चित्रे कमी झालेली असली तरी नष्ट नाही झालीये.
वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या कारणा वरुन तिची चाचणी केली जाते. एखादा संवेदनशील, सुंदर मुद्दा क्रौमार्य चाचणी साठी वापरला जाणे यासारखी हिंसा खचितच कुठे घडत असेल.
घर असो की घरा बाहेर.. यापैकी एकही जागा सुरक्षित वाटू नये म्हणजे ही तथाकथित आधुनिक युगाची हार आहे. खाजगी ठिकाण असो की सार्वजनिक.. अनेक नजरा हिंस्त्र भासत असतात. हिंसा, बलात्कार, ॲसिड ॲटैक, ऑनर किलींग, विनयभंग, जबरदस्ती लाउन देण्यात आलेले विवाह अशा एक नाही हजार गोष्टी आहेत स्त्रीच खच्चीकरन करायला. पण जी नवीन जीव निर्माण करण्याची ताकद ठेवते ती अशी लगेच हारणारी नसते. जगभरात अनेक संस्था महिला सक्षमीकरणा साठी सारसावल्या आहेत.
भारत आणि शेजारी राष्ट्र हुंडबळीत अव्वल आहेत. आपण प्रगती करायला विकसित राष्ट्रांच्या बरोबरीने नसलो तरी नासलेले विचार प्रकट करायला अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांची बरोबर साथ देत आहोत.
आज अनेक कायदे जोड़ीला आहेत. शिकलेल्या महिला त्यांच्या मदतीने अन्यायाला वाचा फोड़ू शकतात पण ग्रामीण भागतल्या अडानी महिला सहन करण्यापलीकडे काहीच करू नाही शकत.
जो समाज जन्माआधीच जीव संपवण्याची तयारी ठेवतो त्या समाजा कडून फार अपेक्षा करने तसे चुकीचेच ठरेल.
ईथल्या राजकारणी महिला आदर्श होण्या ऐवजी रूढ़ी ,परंपरा शिकवतात तिथून काही प्रेरणा घेणेही व्यर्थ ठरेल. ह्यूमन ट्रॅफिकींग मध्ये सुद्धा महिलांच् प्रमाण जास्त आहे. त्यांच्या इच्छे विरुद्ध अनेक बेकायदेशीर गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागते. जगण्यासाठीचा एक वेगळाच संघर्ष या महिला करतांना दिसतात.
कधी कधी वाटत बाईमाणूस का म्हणताय? फक्त बाई म्हणा.. अरे, ती माणूस कुठेय? निदान तस वागवलय तरी का? या आधी होते अशिक्षित लोक..पण आता दिवस बदलताय अस खरच वाटत असेल तर प्रत्यक्ष बदलाला समोर जाण्याची प्रत्येक पुरुषाची तयारी हवी.. का हवीय पुरुष आणि स्त्री प्रधान संस्कृती? दोघेही फक्त माणूस म्हणून नाही जगू शकत? एकमेकांच्या सोबत चालण्यातच सर्व काही आहे. उच्च, निच्च, ताकद, कमजोरी ह्या बाबीं सोबत जगलो तर ते जगणे व्यर्थ ठरेल.
Comments
Post a Comment