नदी
इतका गोडवा की समुद्रात जातांना खारे होऊ याची चिंता नाही, तर आपल्या जाण्याने त्याची विशालता टिकणार ही समज असणारी नदी.. तिच्यासारखीच.. ती तर स्वतः बद्दल इतकी आश्वस्त आहे की, तिच्या बांगडीने सुद्धा किनाऱ्यावर थैमान माजू शकतं. "नदिया किनारे हेराए कंगना.."
मागच्या डोळ्यांच्या लेखात, "पी लू तेरे नीले नीले नैनोसे शबनम" यावर लिहायचं राहून गेलं असलं तरी आत्ताच्या- नदीच्या लेखात, या गाण्यातलं - "जिस तरह तू खोई हो नदी.. " हे मात्र miss नाही होणार. ती नदीसारखीच हरवून जाते सागरात. तो सागरासारखाच कुठे स्थिर, कुठे अस्थिर पण तरी शांत होतो तिच्या येण्याने. "पी लूं तेरी धीमी धीमी लहरों की छमछम"..
ती नुसती येत नाही, सगळं पार करून येते. तेव्हा कुठे शांतता मिळणार असते. "इन प्यार की राहों में पत्थर हैं कितने, उन सब को ही पार किया| इक नदी हूँ मैं, चाहत भरी आज, मिलने सागर को आई यहाँ"
तिला जर विचारलं कुठे चालली मुरडत तर घाबरत, लाजत नदीसारखंच समुद्राला भेटायला चालले असं सांगेल. "एक नदी से मैंने पूछा, इठला के चलती कहाँ? डोर तेरे पी का घर है, बलखा के चलती कहाँ? थोड़ा वो घबराई, थोड़ा सा शर्माई. उछली यहाँ से वहाँ... सागर से मिलने का, उसका तो सपना था मेरीही तरह पिया..."
हे झालं अस्वस्थ नदीचं, पण ती जी, आजूबाजू दगड नसतांना संथ वाहते... स्वतःची space मिळाल्यागत. आणि मग पुन्हा इतरांना मार्ग दाखवायला तयार.. "मोजवा करे क्या जाने हमको इशारा..." मार्ग माहित नसेल तर विचारणार आणि तिथे नेऊन सोडणार.. "जाना कहा है पुछे नदीया की धारा.."
पण तिच्या मर्जीनेच सोडेल का, तिला हवं तिथे? हे स्वातंत्र्य तिला आनंद बक्षी यांनी दिलं. "मरज़ी है तुम्हारी
ले जाओ जिस ओर.."
स्वतः च्या अस्तित्वासाठी झगडणारी ती... झेलमच दुसरी.. "झेहलुम, झेहलुम ढूंडे किनारा
किसे पूंछे कितनी देर से
दर्द को सेहते जाना है
अंधी रात का हाथ पकड़कर
कब तक चलते जाना है.." विशाल भारद्वाज किती विशाल शब्द, किती विशाल दुःख आहे त्या आवाजात.. नदीच्या आवाजात काय असतं..? ऐकू तर खळखळ येते.
"हळूच येते, हळूच जाते
गोड गोड गाणी, मनाला गाते
लाटांवरती नाचत येते
अंधाराला सांधत जाते...
तीरावरती पाऊल पडे
मनामधील सावल्या धरी
भिजले भिजले मन झाले
गोदावरीच्या या तीरी...
खळ खळ गोदा, खळ खळ गोदा
पाण्यामध्ये सांजवेळ, नितळ नीळ गोदा..."
वेळ पडेल तशी शांत आणि अशांतता दाखविणारी नदी.. तिच्यासारखीच. त्याची भौगोलिक आणि मानसिक कारणं आपण आपआपल्या परीने ओळखायची..

Comments
Post a Comment