यश आणि स्वप्न

  




   एक चक्र असतं. त्यात जेव्हा यश आणि त्यामागे धावण्याची तजवीज नसते तेव्हा ताणतणाव कमी असतो. Stress management च्या ट्रिक्स मध्ये एंटरटेनमेंट, socialise होणं हे पर्याय असतात. पण हे पर्याय आपण बाद करतो, जेव्हा आपल्याला यश हवं असतं. असं वाटतं एकदा यशस्वी झालो की, हे पर्याय वापरू. पण कदाचित, यश चक्रव्युहासारखं आपल्याला या पर्यायांपर्यंत पोहोचू देत नाही. 

रोज़ रोज़ आँखों तले एक ही सपना चले

रात भर काजल जले, आँख में जिस तरह

ख़्वाब का दिया जले|

         एका स्वप्नासाठी आपण काय नाही करत? बर्‍याच गोष्टी त्याग करतो. जेव्हा त्या स्वप्नाचा काही अंश तरी पूर्ण होतोय असं वाटतं,  तेव्हा मात्र आपलं खाजगी आयुष्य तेवढेच अंश विस्कळित झाल्यासारखं भासतं. 

         मी आणि किरण, कदाचित आम्ही अवास्तव स्वप्न पाहिले असणार. पण जेव्हा केव्हा स्वप्नांच्या सीमेपर्यंत पोहोचतोय असं झालं, तेव्हा आयुष्यात ज्याच्या सोबत कायमचं राहायचं असं ठरवलं होतं, त्याच्याच पासून दूर राहतोय.

        मला तर आता माझ्यात तितकं वाईट वाटावं इतक्या पण भावना उरल्या नाहीत असं वाटतंय. फक्त सुजितला एकटं राहावं लागतं, ह्याचा मात्र त्रास होतो. किती गहिवरला होता माझा जीव, फक्त मुंबई सोडायची म्हणून नाही तर सुजितला एकटं राहावं लागणार म्हणून. कारण मुंबई तर मी पाचच महिन्यांसाठी सोडत होते ना. आणि आता मुंबई तर कायमची सोडलीच पण सुजितही मागचे एक दिड वर्ष तिकडे एकटाच आहे. 

       मुंबईत ज्या घरात राहत होतो, तेही सोडलं. सुजित सारखा कमी भावनाशील माणूस किंचित का होईना नाराज झाला म्हटल्यावर मी कसं मागे राहू. वाईट वाटून तर घेतलंच मी. पण पुन्हा माझ्यात बदल झाल्याप्रमाणे लगेच सोडूनही दिलं. 

गिरगावला आयडियल कॅफेत जातांना लागणारे सर्व कॅफे एकदा ट्राय करावे असं वाटायचं.  आज पुन्हा आयडियलला जातांना मात्र तितकी क्रेझ उरलीय असं जाणवलं नाही. पण म्हणून आधी स्वप्न पाहिलेल्या गोष्टी जगणारच नाही असंही नाही. शेवटी, मी इतकं sorted ठरवलंय आता की, good फूड, संगीत आणि moral cause साठी जगून आयुष्य बहरवायचं. 

      बाकी कशावरच नाराज व्हायचं नाही. सृजन नसता तर मुंबईत असते का? हे केलं असतं की तसं जगले असते? कशाला? त्याचं असणं जितकं सुंदर आहे, तितकं त्याच्या असण्याचा निर्णयही आहे. तो पोटात असतांना ज्या आयडियल मध्ये जायचे तिथली गाण्यांची vibe त्यानेही आज एन्जॉय केली. नानू कुणालची आठवण सुजितलाही येतेच. आईला,  beer आणि त्या पिणाऱ्या बायका पाहून नवल वाटणं साहजिक आहे. मला मात्र किती लिटरचा केग असणार हा? असले प्रश्न मनात येत होते.

      कदाचित मला पुन्हा मुंबईत सुजितच्या नव्या खोलीवर जाता येईलही. तिथे ह्या ब्लॉगमध्ये टाकलेला roof नसेल, तिथून दिसणारा समुद्र,  बोटी,  मोनोरेल इ. नसतील.  पण कशातच न रमता लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या यश चक्रावर लक्ष ठेऊन फक्त अभ्यास करायचा आहे. Better position can't make life Better but it can give Best problems and Best mind to think over. 

       

Comments

Popular posts from this blog

पायवाट

Dopamine