चंद्र, ज्याचा त्याचा.


        सृजन सोबत खेळणारी, त्याची मैत्रीण, शौर्या मला म्हणाली, "Aunty, आज चंद्र का दिसत नाहीये?"

मी म्हणाले, "चांदण्यापण नाहीये, ते सर्व लपाछपी खेळताय. ढगांच्या मागे लपले असणार बघ. तू त्यांना शोधणं थांबवू नको."

"अगं, Aunty खूप वेळ झाला. ते बाहेरच नाही आले. इतके का लपलेय?"

"Ummm कदाचित ते आता झोपलेत. ज्या ढगांच्या मागे लपले होते, त्यांनाच पांघरुण करून झोपलेत." 

        लगेच समाधान न होणार्‍या ह्या पिढीच्या शौर्याला हे मात्र लगेच पटलं. गाण्यांचा कितीही व्यासंग असला तरी असलं कल्पक काहीतरी सुचेल आणि कमीतकमी लहानगे convince होतील, असं मला कधी वाटलं नव्हतं. शौर्याच्या निमित्ताने मला माझ्या आवडीच्या चंद्राचा आणि त्यावर बनलेल्या गाण्यांवर विचार करता आला.  

हल्ली instagram वर एका मिनिटात गाण्यांचे अर्थ सांगणारे reels येतात. आम्ही मात्र आमच्या चंद्राला, जे काय तोडकं मोडकं आपल्याला समजलं असेल त्याच भावनेने, ते गाणं पाठवून द्यायचो. हल्ली पैसा खूप लागतो पण गोष्टींची किंमत मात्र कमी होत चाललीय नाही? "ये भी ठीक है|" 

         बाकी, इतक्या लहान वयात चंद्र दिसणं किंवा तो न दिसण्याची भौगोलिक कारणं तिला सांगून चालणार नाही. तिचा चंद्र तिला एक दिवस दिसणारच, तसंच तो असणं आणि नसण्याची कारणंही तिची तिला समजणारच. 

आपण फक्त पिढी, दर पिढी होणारी ही संक्रमणं अनुभवायची, पाहायची.... चंद्राला पाहतो तशीच...

#genZ

#genAlpha

#genMillenial


Comments

  1. Your thought process is truly remarkable, ma'am. Your writing is filled with love, insights, and vivid scenic descriptions that leave a lasting impression after every blog entry. I was particularly touched by how you intertwined your affection for the moon with Sauraya's profound curiosity and perspective, all wrapped in the musical rhythms of life. Please continue writing, ma'am.

    ReplyDelete
    Replies
    1. Your valuable feedback would help me to be consistent. Thank u!

      Delete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine