तारीख
आपल्याला स्थलांतरित असा शिक्का बसू शकतो, पण तरी एखाद्या शहराची भुरळ पडली तर आपण असे शिक्के घेऊन जगू शकतो. मला मुंबईची अशी भुरळ आहे. अकरावीच्या सुट्टीत पहिल्यांदा मुंबई पाहिली. गिरगांव चौपाटीवर 'हम तो दिवाने हुए आज....' हे गाणं सुरु होतं. मला तर ते त्यावेळेला एकदम appealing वाटलं. दिवानंच तर करतं हे शहर. नाही आवडू शकत एखाद्याला तिथली धावपळ. पण माझ्यासारखीला तेच आवडलं.
परीक्षेच्या निमित्ताने जाणं व्हायचं मुंबईत. नंतर सुजितच्या बदलीमुळे राहायलाच गेलो. बापरे! It was like dream comes true. सर्वांना वाटायचं हिला एकटीला कसं करमत असेल. पण मुंबई एकटं पाडते का? घराचं सगळं बघण्यात, स्वयंपाक करण्यात, तेव्हाच्या मी देत असलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंग, नंतर घेत असलेले lectures, series आणि movies पाहणं, अभ्यास करणं यात दिवस कसा जायचा कळायचं पण नाही.
एकदाचं मी शाहुला घेऊन मुंबई गेले. हेच routine सुरळीत होत होतं तोच मागच्या वर्षी सतरा जूनला मी राज्य उत्पादन शुल्कच्या लेखी परीक्षेत पास होऊन शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरल्याचा निकाल आला होता. सुजितला म्हटलं आणखी काही निकाल पेंडिंग आहेत तर वाट पाहू. आणि ही मैदानी परीक्षा तयारी नसली तरी देते. परीक्षेची तारीख आली की, पाहू काय सराव करता येईल. पण त्याने ओपन, ओबीसी सर्व महिला मोजल्या. (आम्ही तेव्हा दादर वरून नाशिक येत होतो) मला त्याने दादर प्लॅटफॉर्मवरच सांगून टाकलं. तू ओपन आणि ओबीसी महिला दोन्ही मोजल्या तरी शंभरच्या आतच आहे. अजिबात आता मुंबई यायचं नाही. नाशिकलाच राहून सराव करायचा.
I was like, आपलं परतीचं तिकीट आहे, तेवढं तरी येऊ दे 😝. पण त्याचं म्हणणं सृजनमुळे म्हणतोय नाशिकच थांब. नाहीतर सराव मुंबईत पण झालाच असता. झालं, मी जुनचा शेवटचा आठवडा, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे तीन आठवडे फक्त तब्येत वाढवणं, पळणं, आणि शेवटचा एक आठवडा गोळा फेकणं एवढंच केलं. पाऊस, ऊन, एकट्याने सराव काहीही असो फक्त पळायचं एवढाच ध्यास धरला. पोरगं घरी सोडून यायचं मग इथं तरी यश मिळो, असं सारखं वाटायचं.
आणि भर म्हणजे मुंबई सोडून राहतेय तर फळ तर मिळोच😁. नवरा एकटा, पोरगं काही तास एकटं, मला होणारा त्रास वेगळा. मैदानी चाचणीच्या एक दिवस आधी, घरीच थांबायचं म्हणजे अचानक काही छोटी मोठी शारीरिक अडचण नको यायला असं ठरलं. खरंतर, मला बरंच नव्हतं वाटत. मैदानावर जाऊ शकत नाही असं वाटत होतं (जाणार तर होतेच 😎) पण मग काहीतरी मोटिवेशन पाहू, घरी आहे तर, असं वाटून 'भाग मिल्खा भाग' पाहिला. मिल्खाच्या पायाला झालेल्या जखमेसोबत तो पळतो आणि राष्ट्रीय रेकॉर्ड तोडतो. यापुढे आपलं बरं न वाटणं काहीच नाही हे मोटिवेशन मला मिळालं. ह्याचा निकाल असा आला की, I scored 70/80. दिसायला बारीक दिसणारे नेहमी underestimate केले जातात. But u never know what potential they can hold! सगळं कसं सिनेमात मिल्खा गातो, तसं 'ओ रंगरेज' झालं मला. 😁
माझे लेखीचे 86 गुण पण सुजितला कमी वाटायचे. आणि मला हे 70 कमी वाटायचे. आमच्या दोघांचं खरं असतं तर कदाचित मी राज्यात पहिली असते. पण मी बारावी आले. नाशकात पहिली आले.
यानंतर मात्र मी मुंबईत पाहुणी झाले. सुजित नाशिकला येत नसेल तेव्हा फक्त मुंबईत जायचं एवढाच काय तो संबंध उरला. पर ये भी ठीक है. नैसर्गिक अधिवास असलेल्यांनीच राहिलेलं बरं. 😁 ना स्थलांतरीत शिक्का, ना माणसांचं मुंबईत अतिक्रमण. 😄
एखादी तारीख डोळ्यासमोर आली तर काय आठवू शकतं, ह्याचा हा नमुना.
याआधीही तारखेवरून लिहिलेलं -
Comments
Post a Comment