२९ एप्रिल, सैराट, इरफान खान आणि २०२०.

मृत्यू ठरलेलाच असतो पण तो अपेक्षित नसल्याने त्रास होतो. सर्वत्र मृत्यू तांडव चालू असताना हे प्रकर्षाने जाणवतंय..
काही तारखा अशा अनपेक्षित वळणासाठीच बनलेल्या असतील का? खरंतर हा अतिविचाराचा प्रकार आहे. पण २९ एप्रिल २०१६ रोजी सैराट रिलिज झाला. त्याचा शेवट अनोळखी नव्हता . त्यापूर्वी सुद्धा same घटना, same चित्रपट होऊन गेले होते. पण दिग्दर्शनाची कमाल की, शेवट predict च झाला नाही . आणि जेव्हा शेवट घडला तेव्हा मोठा धक्का बसला.
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातील lockdown मध्ये आपण सगळेच Quarantine होतो. एक एक दिवस मोजून काटत असताना, ज्याला तुमच्या बद्दल ठाऊकही नाही अशा तुम्ही प्रेम केलेल्या माणसाने हे जग सोडल्याची बातमी येते. नेहमीप्रमाणे खोटं असणार असं म्हणत गूगल केलं तर बातमी खरी होती. इरफान खानने हे जग सोडलं होतं. मागच्या दोन वर्षांपासून न्युरो इंडोक्राईन सोबत झगडणाऱ्या इरफानची २९एप्रिल २०२० रोजी झालेली एक्झिट अनोळखी नव्हती. पण ती याच दिवशी चार वर्षांपूर्वी आलेल्या सैराट सारखीच अनपेक्षित होती.
See, अतिविचार असं कशावर पण लिहायला भाग पाडू शकतात.. पण तारखा, कलाकृती आणि कलाकार यात महत्त्वाची भूमिका पार पडतात.
मृत्यूचे हे भयंकर तांडव लवकर थांबले पाहिजे . हे अनपेक्षित धक्के आता असह्य झालेय..

Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine