Posts

Showing posts from April, 2020

पश्चिमेकडचा राष्ट्रवाद (भाग २)

Image
     मानवाचा इतिहास आजवर आलेल्या अडचणींना सामोरे जात घडत असतो.या अडचणी पृथ्वीवरच्या भिन्न ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात येत असतात आणि त्यांना कोण कशा पद्धतीने सामोरं जातंय यावरून तिथल्या माणसांचं वेगळेपण दिसत असतं. भारताच्या डोक्यावरील ताज ढगांसारखा बदलत राहिला. कधी हवाहवासा तर क़धी विजेसारखा काळोखी.. आता फक्त पायदळ, हत्ती, उंट, राजेशाही, घुमट इ राहिले नाही. आता पाश्चिमात्य देशाचे अंग ह्या मातीत उतरू लागले आहेत. पूर्वीचे मुघल, पठाण इ. त्यांच्या वंशांवरून आणि धर्मावरून ओळखले जात होते पण आता हे देशांचे आक्रमण आहे. शिवाय अजून आपला स्वतःचा देश ही संकल्पना आपल्याकडे नसतांना आपल्याला पाश्चिमात्य देशांसोबत संघर्ष करावा लागतोय. तर मग देश काय आहे? लोकांचे राजकीय आणि आर्थिक संघ जे यांत्रिक हेतूने एकत्र येतात. समाज हा मानवाची सामाजिक प्रतिमा आहे. तो, माणसांचं नैसर्गिक नातं दर्शवतो, ज्यामुळे माणूस जगण्याचे तत्व एकमेकांना मदत करत प्रस्थापित करत असतो. त्याची राजकीय बाजू काही खास कारणानेच दिसून येते. जेव्हा राजकीय आणि वाणिज्य संस्था , म्हणजे खरं तर एक देश, तोलमोल राखण्याऐवजी...

चाइल्ड पोर्नोग्राफी

Image
प्रत्येक गोष्ट पडद्यावर दिसत असतांना तिच्या मागे काहीतरी बरं वाईट घड़त असल्याचं आपल्याला कालांतराने कळू लागतं. जानेवारी 2020 मध्ये इंडिया चिल्ड्रेन प्रोटेक्शन फंड ची स्थापना झाली. NGOs च्या मदतीने बालकांचे शोषण थांबविण्यासाठी ही संस्था निधी पुरवणार आहे. परंतू, काहीच वेळानंतर कोरोना मुळे सगळीकडे lockdown पाळण्यात आला. आणि या काळात ऑनलाईन विश्व अधिकच वेगाने दौडू लागले. Lockdown झाल्यापासून 95% ऑनलाईन डेटा मॉनिटर करणाऱ्या वेबसाइट्स ने दाखवून दिलं की, या काळात लहान मुलांच्या पॉर्नोग्राफिक कंटेंट ची मागणी वाढलीय. आपल्या भारतात 95% नी ही मागणी वाढली आहे.         चेन्नई आणि भुवनेश्वर इथे हे प्रमाण सर्वात जास्त आहे. 5 December 2019 रोजी राज्य सभेत जयराम रमेश यांच्या अध्यक्षतेखाली इंटरनेट वरील कंटेंट आणि त्याचा बाल मनावर होणारा परिणाम या बद्दलचा अभ्यास करण्यासाठी AD HOC committee ची स्थापना करण्यात आली. AIDMK च्या विजीला सत्यानांथ यांनी हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केल्या नंतर उपराष्ट्रपती वैंकैया नायडू यांनी ही कमिटी स्थापन करण्यास सांगितले होते. ह्या कमिटी मध्...

आर्थिक आणीबाणी

आर्थिक आणीबाणी ही कलम 360 अंतर्गत राष्ट्रपतींनी घोषित केल्या नंतर संसदेच्या दोन्ही घरांनी साध्या बहुमताने दोन महिन्याच्या आत सहमती दिल्यास लागू होते. देशाचे किंवा देशातील एखाद्या भागाचे आर्थिक स्थैर्य धोक्यात आले आहे असे राष्ट्रपतींना पटले तर ते आर्थिक आणिबाणी घोषित करु शकतात. राष्ट्रपतींना खात्री पटली आहे, हे १९७८ च्या ४४ व्या घटना दुरुस्ती नुसार न्यायालयीन विलोकणाच्या कक्षेत येते. इतर दोन्ही आणीबाणींना एकदा लागू झाल्यानंतर संसदेची संमती दर सहा महिन्यांनी घ्यावी लागते, परंतू,ह्या आणीबाणीला संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते. राज्यात सेवा करीत असलेल्या सर्व किंवा काही व्यक्तींच्या वेतनात व भत्त्यात कपात आणि राज्य विधी मंडळाने संमत केल्यावर सर्व अर्थ विधेयके किंवा इतर वित्तीय विधेयके राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे. राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवटीत न्यायाधीशांच्या पगार आणि वेतनावर कोणताच परिणाम होत नसला तरी आर्थिक आणीबाणीत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या वेतन आणि भत्त्यात कपात होते. हीच गोष्ट राष्ट्रपतींच्या आदेशानुसार,सर्व किंवा काही वर्गांच्या के...

जपानमधील राष्ट्रवाद (भाग १)

    रवींद्रनाथ टागोरांनी बंगाली साहित्य, संगीत आणि भारतीय कलेला एक नवा आयाम दिला. पण त्याला १९ व २० व्या शतकातील आधुनिकतेचा स्पर्श होता. अशा रीतीने ते नोबल पारितोषिक मिळवणारे पहिले युरोपियन नसणारे व्यक्ती ठरले. त्यांचा जन्म १८६१ साली कलकत्ता येथे देबेंद्रनाथ टागोर आणि सारदा देवी यांच्या पोटी झाला. बंगाली पुनरुज्जीवनात टागोर कुटुंबीय सक्रिय होते. रवींद्रनाथ यांनी चित्रकला, भूगोल, इतिहास, साहित्य, गणित, संस्कृत, आणि शरीररचनेचा अभ्यास केला होता. त्यांची अशी समजूत होती की, योग्य शिक्षण फक्त शिकवण देतं असं नाही तर आपल्या कुतुहलाला इंधन देतं. रवींद्रनाथ यांनी मृणालिनी देवी यांच्याशी १८८३ मध्ये विवाह केला. १९०५ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांनी ऑगस्ट १९१० ला गीतांजली चे प्रकाशन केले. या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर त्यांनी स्वतः ने १९१२ साली केले. त्याचे प्रकाशन इंडियन सोसायटी ऑफ लंडन ने केले. १९१५ साली ब्रिटिशांनी रवींद्रनाथ यांना नाईटहूड हा किताब दिला. १८७८ ते १९३२ मध्ये ते ३० देशांमध्ये जाऊन आले. त्यांनी जपान आणि अमेरिके मध्ये मे १९१६ ते एप्रिल १९१७ मध्ये व्याख्...