पश्चिमेकडचा राष्ट्रवाद (भाग २)


     मानवाचा इतिहास आजवर आलेल्या अडचणींना सामोरे जात घडत असतो.या अडचणी पृथ्वीवरच्या भिन्न ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात येत असतात आणि त्यांना कोण कशा पद्धतीने सामोरं जातंय यावरून तिथल्या माणसांचं वेगळेपण दिसत असतं. भारताच्या डोक्यावरील ताज ढगांसारखा बदलत राहिला. कधी हवाहवासा तर क़धी विजेसारखा काळोखी.. आता फक्त पायदळ, हत्ती, उंट, राजेशाही, घुमट इ राहिले नाही. आता पाश्चिमात्य देशाचे अंग ह्या मातीत उतरू लागले आहेत. पूर्वीचे मुघल, पठाण इ. त्यांच्या वंशांवरून आणि धर्मावरून ओळखले जात होते पण आता हे देशांचे आक्रमण आहे. शिवाय अजून आपला स्वतःचा देश ही संकल्पना आपल्याकडे नसतांना आपल्याला पाश्चिमात्य देशांसोबत संघर्ष करावा लागतोय. तर मग देश काय आहे? लोकांचे राजकीय आणि आर्थिक संघ जे यांत्रिक हेतूने एकत्र येतात. समाज हा मानवाची सामाजिक प्रतिमा आहे. तो, माणसांचं नैसर्गिक नातं दर्शवतो, ज्यामुळे माणूस जगण्याचे तत्व एकमेकांना मदत करत प्रस्थापित करत असतो. त्याची राजकीय बाजू काही खास कारणानेच दिसून येते. जेव्हा राजकीय आणि वाणिज्य संस्था , म्हणजे खरं तर एक देश, तोलमोल राखण्याऐवजी बलाढय बनतो, तेव्हा ती वेळ मानवतेसाठी दुष्ट ठरते. जेव्हा एक वडील, कुटुंबाला सोडून जुगाराच्या नादाला लागतात, तेव्हा ते एक मानव नसतात. तर एक असे सजीव उरतात, ज्याला फक्त लोभ कळतो. यश मिळणं ध्येय असते आणि त्या प्रक्रियेला दिलेला न्याय असतो. पण चांगुलपणा हा मनुष्याचा शेवटचा हेतू असला पाहिजे. इंग्लंडमुळे फक्त आपल्या देशावर काय परिणाम होईल हे टागोरांना सांगायचे नव्हते, तर त्यांना पूर्ण मानव जातीवर काय परिणाम होईल यावर बोलायचे होते. असं मानावं लागत होतं की, पश्चिमी देश पूर्वेसाठी गरजेचे आहेत. एकमेकांना पूरक आहेत. कारण, आयुष्याकडे बघण्याची दोघांची दृष्टी ,दोन वेगळे सत्य मांडत होती. भारत कोणा एका वंशाचा बनलाच नाही. पण भारतात अनेक वंश एकत्र येण्याची क्रिया घडून आली. - द्रविड, आर्य, पुरातन ग्रीक, इराणी, पश्चिमेकडील इस्लामी आणि मध्य आशियातील मुस्लिम.. आता इंग्रजांना पण हेच सत्य स्वीकारून भारताची नियती ठरवावी लागेल. कोणा एका सत्तेला इथे वगळून चालणार नाही, हे त्यांनी समजून घ्यायला हवं. त्यामुळेच टागोरांना वाटते की, देश म्हणजे एकट्या भारताच्या इतिहासापेक्षा मानवाचा इतिहासच जास्त आहे.. ब्रिटिशांबद्दल त्यांची कार्यक्षमता, शुरता, साहित्य पाहून आदरच वाटतो पण आपल्यासाठी ते गुदमरून टाकणारे धुकेच ठरत आहेत. याआधी इतर सत्तांनी आपल्यावर राज्य केलं पण ते हातमागासारखे भासले. ज्यात मनुष्याच्या कार्याची मधुरता कळायची. परंतू, आता जीवन रहित वाटणारे सत्ताधीश राज्य करताय असं जाणवतं. पूर्वी सुद्धा अन्याय होताच. कायदा, प्रगती आणि नागरिकत्व यात सलगता आणतो. सध्या कायदा सुद्धा वंश इ पाहून न्याय करतो असं वाटतंय. बंड करून उठणं, एका विशिष्ट पाश्चिमात्य देशाकडून नाही आलंय तर ते फक्त पश्चिमेकडून वाहत आलंय. जपान, चीन, इराण इ पैकी काही देशांनी पाश्चिमात्य देशांचा स्वतः वर प्रभाव पाडून घेतला, किंवा काहींनी त्यांच्याकडून काहीच घेतले नाही आणि काही देशांना मात्र अपर्यायी फरक पाडून घ्यावा लागला. पश्चिमेकडे राष्ट्रवाद काय आहे - चढाई, सत्ता, इतर राष्ट्रांना शिकार समजणं, देश न बनलेल्या ठिकाणी त्यांच्या नागरी संस्कृतीचा प्रवाह तपासणं.. त्यांचा हा राष्ट्रवादच त्यांना वेगळं पाडत असतो. ह्या राष्ट्रवादाचे स्त्रोत ते कधीच शोषितांसमोर येऊ देत नाही.पण त्यांनी बळी घेतलेल्या राष्ट्रांचे ओझे त्यांच्याच सत्तेवर पडणार असते. त्यांनी दिलेली सगळ्यात मोठी गोष्ट कायदा आणि सुव्यवस्थेची.. परंतू, नुसतंच प्रशासन राबवणं अर्थहीन ठरतं. पूर्वीच्या राज्यकर्त्यांकडे आधुनिक सरकारी पद्धती नव्हत्या. आणि त्यामुळेच त्यांच्या प्रशासनाचे वस्त्र अगदी ढिले शिवलेले होते. ज्यातून जनता स्वतःच्या नक्षी कोरत असणार. तेव्हा अनवाणी पायाने फिरायची वेळ आली तरी जुळवून घेता येत होतं आणि आता चप्पल असताना जेव्हा अनुकुचितदार काही टोचले गेले तर ते कधीही न विसरता येण्यासारखे असते. ही चप्पल आजचं सरकार आहे. ज्यात खूप थोडसं जुळवून घेता येतं, पायाला फिरवायला खूप कमी जागा उरते. प्रश्न अडचणींचा नसतो, प्रश्न त्यांच्याशी झगडता येणाऱ्या अधिकारांचा असतो. मानवाच्या इतिहासातील हे रुंद स्वातंत्र पाश्चिमात्य आहे. जर आपण स्वतःला स्वतंत्र समजत असू तर आपण आपल्या स्वातंत्र्याचा बळी देत असतो. प्राचीन इतिहासात, Spartens ने सर्व लक्ष शक्तिशाली बनण्यात घातले पण त्यासाठी मानवता दूर सारली आणि त्यांचा शेवट मात्र विच्छेदनात झाला. हीच गोष्ट पश्चिमी राष्ट्रांची आहे. सत्ता आणि संपत्तीची सामग्री असलेला देश, तिथला झेंडा, धर्म प्रार्थना, तिथले नास्तिक, तिथले राष्ट्राची बढाई मारणारे साहित्य हे सर्व हे सत्य लपवू शकत नाही की, एक देश हाच त्या देशासाठी वाईट आहे . अ- मानवीकरणाची प्रक्रिया वाणिज्य आणि राजकारणात चालू असते. टागोर जपान मधून निघतांना प्रोत्साहन देत होते - पश्चिमेच्या स्वार्थाला, जणू धर्म मानलेल्या तत्वाला न पाळण्याचे.. शेजारी राष्ट्रांच्या दुर्बलतेवर सूडबुद्धी न उगवण्याचे.. ज्ञान आणि क्षमता कितीही शक्तिशाली दिसत असल्या तरी त्या मनुष्याच्या सेवक झाल्यासारख्या आहेत. अधिकार आणि सत्ता मिळवली की, राष्ट्र स्व गुर्मीत रमते ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्या राष्ट्राच्या स्वाधीन स्वतःला करते. हीच ती असंगती आहे , जिथे व्यक्ती सगळे त्याग करत देवाला पुजत असते, ज्याचं अस्तित्व त्या व्यक्तीच्या अस्तित्वा इतकं खरं नसतंच. राष्ट्र ही संकल्पना मानवाने शोधलेल्या संकल्पनांपैकी सगळ्यात जास्त भुल देणारी गोष्ट आहे. मानवी समाज नियंत्रित राजकारण्यांचा, सैनिकांचा, नोकरशाहीचा कुशल दिखावा आहे. NATIONALISM IN WEST

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine