मैत्री
"मैत्रीशिवाय आयुष्य म्हणजे आकाशा शिवायची पृथ्वी!" .. असं लिहून प्रवीण दवणेंनी किती कमी शब्दांत मैत्री ची योग्य व्याख्या मांडली आहे.. Sharing of a pencil, is the best medium to start a sweet relationship अशा आशयाचं कुठेतरी वाचायला मिळालं होतं, यात तथ्य किती आहे माहित नाही पण माझ्या मैत्रीच्या प्रवासाची सुरुवात एका पेन्सिल पासूनच झाली होती. आणि त्यामुळे माझ्या आयुष्यात 'जागृती' आली होती. ज्या वयात घरातली माणसं सोडून इतर नाती समजत नसतात, त्या अजाण वयात अचानकच गट्टी होते आणि मैत्री काय असते हे कळत नसतानांही ती अनुभवायला मिळते. मैत्री फक्त दोन जीवांमधलं नातं म्हणून उरत नाही तर ती एक भावना म्हणून जगली जाते.. खरंतर अशा मैत्रीला, जिच्या बद्दल कोणाच्याच मनात दुमत नसणार, तिला असं शब्दांत कैद करून उतरवणं म्हणजे एक बंधनच आहे. तरी देखील आजवर जगलेल्या आणि अशाच निर्मळ मैत्रीच्या आशेत जगण्याची इच्छा बाळगून असणाऱ्या आपल्या सर्वांसाठी लिहीलेला हा मैत्री प्रपंच... प्रत्येक दिन दिमाखात साजरी करण्याची मनुष्याची प्रथा आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांचा आवडता दिन कसा मागे राहील?...