प्रश्न
ते कुठेही छळतात..
घरात, बाहेर..
एखाद्या पोकळीतही उद्भवतील का?
गर्दीत आणि एकटेपणातही धुमाकूळ घालतात..
त्यांची निर्मिती कशी झाली?
पुन्हा प्रश्न..
तुम्ही आणि आम्हीच केलीये ना;
जावं का मग हे सगळं सोडून?
पुन्हा प्रश्न..
पण कुठे?
जिथे गर्दी नसेन?
म्हणजे कुठे?
वाळवंटी की ध्रुवावर?
तिथेही येईल का गर्दी?
उत्तरं शोधत येईलच म्हणा..
मग परत तिथूनही सुटका व्हावी असंच वाटेल ना..
अरे...!! प्रश्न सुटणार नाहीच.. तो विस्तारत राहील.. अखेर पर्यन्त..
मला पण जीव जाई पर्यन्त करायचाय विचार.. प्रश्नाचा?- नाही त्याला सोडवण्यासाठी सज्ज होण्याचा..
-तेजल एस. डी.
(Image courtesy- stock.com)

Comments
Post a Comment