पत्र 2
माझ्या प्रिय बाळास,
खरंतर, हे पत्र तुला वाचायला मिळेल तेव्हा तू बाळ नसणार आहेस.. पण आई साठी नेहमी बाळ असणाऱ्या तुला चार गोष्टी महत्वाच्या सांगणं माझं काम आहे..
तुझं अस्तित्व ह्या जगात येण्यापूर्वीच मी हे पत्र लिहायला घेतलंय..
मला मान्य आहे की, घरातलं सगळ्यांचं वागणं आणि तुझी शाळा यामुळे काही नैसर्गिक गोष्टींंचं महत्व तुला कळणारच आहे. पण सगळं समजल्यावरही कधी कधी विरोधात वागलं जातं आणि त्या अपराधी भावनेतूनच मी आज हे पत्र लिहतेय असं समज. तुझं वाचन आणि तुझ्यातील समज यांचा परिपाक होत असतांंनाच हे पत्र तुझ्या पर्यंत पोहोचेल याची मी खबरदारी घेईल.
बाळा, आई आणि पप्पा यापेक्षाही तू जास्त वेळा उच्चारलेला शब्द 'मम्मम' असेल. म्हणजे अगदी लहानपणापासूनच पाणी एखाद्या भावनेसारखं तुझ्या सोबत आणि प्रत्येकच जीवासोबत जडलंय. पाण्याशिवाय जीवनच व्यर्थ आहे ते उगीच नाही म्हणत ना! आपलं हे मुख्य पेय आहे यासोबतच तुला जलचक्रही शिकवलं असेल.. त्यामुळे त्याबद्दल आज मी इथे काही लिहीणार नाही पण ते जलचक्र सुरळीत चालावं यासाठी काही गोष्टी तुला माहीत असणं महत्वाचं वाटतं.
निरोगी राहायचं असेल तर स्वच्छता हवी आणि स्वच्छता हवी असेल तर पाणी हे हवंच.. तुला झाडांची सजीवांच्या आयुष्यातली जागा ठाऊक आहे.. ही झाड़ी लावणं आणि ती वाढवणं पाण्याशिवाय अशक्यच आहे..
वीज निर्मितीसाठी देखील पाणीच लागते.. म्हणजे 'वीज' वाचवून आपण पाणी आणि स्वतः वीज असं दोघांचं संवर्धन करत असतो तर 'पाणी' वाचवून आपण सगळी सृष्टीच वाचवत असतो. यामुळेच तुला घरात सगळेच लाइट, फॅन, टीव्ही, पाण्याचे नळ गरजेपुरतंच वापरतांंना दिसतील. लक्षात ठेव!- ज्या गोष्टी आपण वापरत असतो, त्यांचं आपण देण देखील लागत असतो.. ही भावना आपल्या वागण्यातून देखील दिसली पाहिजे. कधी कधी आपल्या ह्या नियमांकडे अनेक हास्यास्पद मार्गाने पाहिलं जातं.. पण तू तिकडे लक्ष नाही दयायचय.. कारण, जग आपल्या वर हसण्या साठीचं असतं . आपण मात्र त्यातून पुढे जायचं असतं, मग मागे वळून पाहिल्यावर ओठांवर आपसूकच किंचित हसू पसरतं..
तुला विशेष वाटेल पण बाळा, मोठं झाल्यावर सणवार याकड़े उत्सव म्हणून पहावं वाटत नाहीये. मग कितीही उत्साह असला तरी आजुबाजूची भयावह परिस्थिती पाहता अंगात ते साजरं करण्याचं बळ येत नाही. 2015 च्या दुष्काळामुळे अनेकांनी रंगपंचमी साजरी न करण्याचं ठरवलं होतं.. म्हणजे आमच्या किंवा आमच्या आधीच्या पिढीच्या चुकांमुळे तुमची पिढीला अशा कितीतरी उत्सवांची माहितीही नसेल असं वाटतंय. म्हणूनच, आपल्याकडे मुबलक पाणी असलं तरी ते वाया घालवायची इच्छा होत नाही. आणि तसं झालंच तरी पुढचे अनेक दिवस मनात ती अपराधी भावना आल्याशिवाय राहत नाही. हीच भावना तुझ्या पर्यंत पोहोचवावीशी वाटली, म्हणजे भविष्यात विचारांशी आणि वागण्याशी स्पष्ट राहिल्यास होणारी गफलत टाळता येईल. खरंतर पाण्याचं महत्व आपल्याला कळणारच नाही जितकं ते एखाद्या तहानलेल्या जिवाला कळेल.
तुला मी नकाशावर दक्षिण आफ्रिकेतलं 'केप टाउन' शहर दाखवेल. ते जगातलं पहिले मोठे पाणी नसलेलं शहर असणार आहे. तिथे यामुळे zero day देखील घोषित करण्यात आला होता. आपल्या भारतात पण चेन्नई मध्ये हीच परिस्थिती उद्भवते की काय? अशी भिती वाटते. हे सर्व पाहता तू जाणकार होईपर्यंत तिसरे महायुद्ध पाण्यामुळेच होईल अशी तज्ञांंची शंका खरी वाटायला लागते. आता तुला पाण्याबद्दलची कळकळ आणि महत्व समजलं असेल अशी मी आशा बाळगते.
तुला माहीत आहे ना, निसर्गाच्या साखळीत झाड़े जगली तरंच पाऊस पडेल आणि सर्व जीव सुखावतील..
मानवाने बुद्धीच्या जोरावर सर्व काही विकसित करता करता निसर्गालाही आव्हान दिलं. ज्यामुळे सृष्टिचं चक्र बिघड़लं. हवेत कार्बन डाइऑक्साइड तर उत्सर्जित केला गेला पण ह्या वायूच्या शोषणासाठी झाड़ेच नाही ठेवली. ज्यामुळे उन्हाळा अजून तीव्र होतोय. सावलीसाठी एक झाड मिळणं पण कठीण झालंय. मी आजपर्यंत बागांचं विशेष संगोपन नाही केलंय, त्यामुळे महत्व पटूनही काहीच न केल्याची खंत पण मनात आहेच. मग त्यासाठी कागद वाचवणे, टिश्यू पेपर कमीत कमी वापरणे असा थोडासा हातभार लावत असते.
मनुष्याने स्वतःच्या नियोजनासाठी कैलेंडर आखलंय पण आपण त्यातले मोजकेच दिवस साजरे करतो. आपण आजवर पाणी आणि झाडांसाठी काय केलं आणि इथून पुढे काय करणार आहोत ह्याचं नियोजन पाणी दिन(22 मार्च) आणि वसुंधरा दिन (5 एप्रिल) रोजी करावं असं मला वाटतं.
तुला 'श्यामची आई' आवडलं ना? त्यातल्या शाम ने अर्थात सानेगुरुजींंनी 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' म्हटलंय.. आपण जगाला जिवंत ठेवणाऱ्या 'झाड़े आणि पाण्याला' देखील प्रेम अर्पण करू..

Comments
Post a Comment