Smile
आपण लय वैतागलेलो, थकलेलो, चिंतेत असलो की, आवडती माणसं, आवडत्या गोष्टी त्यातून बाहेर पडायला नक्कीच मदत करतात ना. ह्या गोष्टी म्हणजे, फुलांवरून उडणाऱ्या फुलपाखरासारख्या असतात. चेहऱ्यावर एक छोटंसं पण अति गोड हास्य आणतात.
घरी येऊन लेकराला, त्याच्या निरागसपणाला पाहून येतं ना तसं हास्य.. घराच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पळणारी मांजर पाहूनही असंच होतं. कांद्याच्या सालीला उंदीर असल्यागत डिवचते आणि घुमशान आणते. तिची ही युद्धनीती पाहूनही हसूच येतं.
फय्याज हाश्मींनी लिहिल्याप्रमाणे,
वक़्त की क़ैद में ज़िंदगी है मगर,
चंद घड़ियाँ यही हैं जो आज़ाद हैं
इनको खो कर मेरी जान-ए-जाँ
उम्र-भर ना तरसते रहो..
पण हे क्षणिक असतं ना. ज्यामुळे, वैतागलेलो, थकलेलो किंवा चिंतेत असतो, त्यातून बाहेर पडल्याशिवाय तरसणं थांबत नाही. फक्त आझाद क्षण हेच मानून वरच्या चिमुकल्या गँगकडे पाहून खूश होत राहावं.
Comments
Post a Comment