Posts

Showing posts from June, 2025

तारीख

    आपल्याला स्थलांतरित असा शिक्का बसू शकतो, पण तरी एखाद्या शहराची भुरळ पडली तर आपण असे शिक्के घेऊन जगू शकतो. मला मुंबईची अशी भुरळ आहे. अकरावीच्या सुट्टीत पहिल्यांदा मुंबई पाहिली. गिरगांव चौपाटीवर 'हम तो दिवाने हुए आज....' हे गाणं सुरु होतं. मला तर ते त्यावेळेला एकदम appealing वाटलं. दिवानंच तर करतं हे शहर. नाही आवडू शकत एखाद्याला तिथली धावपळ. पण माझ्यासारखीला तेच आवडलं.        परीक्षेच्या निमित्ताने जाणं व्हायचं मुंबईत. नंतर सुजितच्या बदलीमुळे राहायलाच गेलो. बापरे! It was like dream comes true. सर्वांना वाटायचं हिला एकटीला कसं करमत असेल. पण मुंबई एकटं पाडते का? घराचं सगळं बघण्यात, स्वयंपाक करण्यात, तेव्हाच्या मी देत असलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंग, नंतर घेत असलेले lectures, series आणि movies पाहणं, अभ्यास करणं यात दिवस कसा जायचा कळायचं पण नाही.        एकदाचं मी शाहुला घेऊन मुंबई गेले. हेच routine सुरळीत होत होतं तोच मागच्या वर्षी सतरा जूनला मी राज्य उत्पादन शुल्कच्या लेखी परीक्षेत पास होऊन शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरल्याचा निकाल आला होता. सुजित...

Smile

 आपण लय वैतागलेलो, थकलेलो, चिंतेत असलो की, आवडती माणसं, आवडत्या गोष्टी त्यातून बाहेर पडायला नक्कीच मदत करतात ना. ह्या गोष्टी म्हणजे, फुलांवरून उडणाऱ्या फुलपाखरासारख्या असतात. चेहऱ्यावर एक छोटंसं पण अति गोड हास्य आणतात.      घरी येऊन लेकराला, त्याच्या निरागसपणाला पाहून येतं ना तसं हास्य.. घराच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पळणारी मांजर पाहूनही असंच होतं. कांद्याच्या सालीला उंदीर असल्यागत डिवचते आणि घुमशान आणते. तिची ही युद्धनीती पाहूनही हसूच येतं.        फय्याज हाश्मींनी लिहिल्याप्रमाणे,  वक़्त की क़ैद में ज़िंदगी है मगर, चंद घड़ियाँ यही हैं जो आज़ाद हैं इनको खो कर मेरी जान-ए-जाँ उम्र-भर ना तरसते रहो..        पण हे क्षणिक असतं ना. ज्यामुळे, वैतागलेलो, थकलेलो किंवा चिंतेत असतो, त्यातून बाहेर पडल्याशिवाय तरसणं थांबत नाही. फक्त आझाद क्षण हेच मानून वरच्या चिमुकल्या गँगकडे पाहून खूश होत राहावं.       

Dopamine

  साधारण दहा वर्ष झाली, शब्द आणि संगीत याबद्दल आमची पिढी सुद्धा तक्रार करू लागलीय. तोवर, एक गाणं कितीदाही ऐकलं तरी त्याचा वीट यायचा नाही. आता लुप वर एकच गाणं लावण्याची हिंमत होत नाही.      अशीच काही वर्ष झाली, आयुष्यात तोवर करत असलेल्या गोष्टींचा कंटाळा यायचा नाही. आता, जीवच मुळी जगतांना किती तळ्यात मळ्यात असतो. मग आपला जीव ठिकाण्यावर नाही हे लक्षात आलं की, सगळ्या गोष्टीतून रस जातो. त्यातूनच, भावना जन्माला येते की -आपलं जगणं इतकं अरसिक कसं असू शकतं? त्या तळ्यात मळ्यातल्या जीवाला घरात कधी आणावं?       संसार, नोकरी ह्या रहाट गाड्यातून घ्यावी मग एक सुट्टी आणि लावावं गाण्याला लूपवर. अर्थात, जगावं मनमुराद. आंबा, जांभूळ किती दिवस झाले अधाशासारखे खाल्ले नाही? काय तर, फक्त पोटाला त्रास होईन म्हणून. होतोच. पण आता सुट्टी टाकलीय तर करताच येईल काहीतरी जुगाड.  किती दिवस झाले शांत आकाशाकडे एकटक पाहायचं राहिलंय? काय तर हल्ली निपचित निवांत पडून राहावंसं वाटतं फक्त. कारण एवढी उसंत मिळणं पण महाग झालंय. कोण म्हणतंय चार रील्स पाहून dopamine व...