स्वातंत्र्यानंतरचा भारत भाग सात



     वैज्ञानिक प्रगती 

तत्कालीन भारताचे पंतप्रधान भारताच्या अनेक समस्यांचे उत्तर विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, असं मानत. मार्च 1958 साली वैज्ञानिक धोरण ठराव संमत झाला. ज्यामुळे देशाची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती यातही विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वाटा असणार होता. यापूर्वीही अनेक वैज्ञानिक संस्था उदयाला येत होत्या. हे मूल्य देशात रुजवण्यासाठी CSIR चे अध्यक्षपद नेहरूंनी स्वतःकडे घेतले. 

या धोरणापूर्वी जानेवारी 1947 मध्ये राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा NPL ही भारताची पहिली प्रयोगशाळा स्थापिली गेली. यासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 17 प्रयोगशाळा उभ्या राहिल्या. 

MIT च्या धर्तीवर खरगपूर मध्ये, पहिली IIT 1952 मध्ये सुरु झाली. 

ऑगस्ट 1948 मध्ये होमी जहांगीर भाभा यांच्या अध्यक्षतेखाली अणू ऊर्जा आयोग उभारला गेला. नेहरू वैयक्तिकरित्या डॉ भाभा यांना सर्वोकृष्ट काम करण्यास चेतावणी देत. 1954 ला सरकारने अणू ऊर्जेसाठी स्वतंत्र खाते सुरु केले. ज्याचे सचिव स्वतः भाभाच होते. ऑगस्ट 56 मध्ये भारताचा पहिला आण्विक ऊर्जाभट्टी प्रकल्प ट्रॉम्बे येथे स्थापन करण्यात आला. हा खरंतर आशियातला पहिलाच असा प्रकल्प होता. 

1962 मध्ये, भारतीय राष्ट्रीय समिती, रॉकेट लौचिंग फॅसिलिटी सोबत थुम्बा येथे उभारण्यात आली. ही समिती अवकाश संशोधनासाठी सुरु झाली. (इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च INCOSPR). 

भारतीय लष्कर साहित्य समृद्ध करण्यावर भर दिला गेला. 

1955 ते 1962 मध्ये आपली वजन आणि मापे पद्धती आंतरराष्ट्रीय निकषास अनुसरून बनविण्यात आली. 

वैज्ञानिक बदलानंतर आपण पुढील ब्लॉगमध्ये सामाजिक बदल जाणून घेऊ.

Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine