पायवाट
आपण एका खेडीप्रधान देशात राहत असल्याने, लांबच्या प्रवासात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातांना अनेक गाव- खेडी, त्यातली शेती, असं बरंच काही (थोडक्यात शहरापासून लांब असलेलं) लागतं. त्यात छोटे छोटे रस्ते दिसतात. खरं, रस्ते नाहीत, पायावटाच त्या. नुसतंच मोबाईल फोन मध्ये फोटो काढण्यात धन्यता मिळणार नाही असे. असं वाटतं गाडीतून उतरून ही वाट आत्ता चालायला घ्यावी का? पण नाही ना चालता येत. ना ते गाव माहित असतं, ना तो रस्ता, ना त्याचं शेवटचं टोक. ह्या आवडणाऱ्या गोष्टी आपल्याला कुठे नेणार असतात कधी कळतच नाही. आवड मात्र प्रत्येक प्रवासात तशीच आणि तितकीच राहते.
हे रस्ते किंवा पायवाटा जगायची वेळ येते, तोपर्यंत जबाबदाऱ्या वाढून, आयुष्यात मिळणारा वेळ कमी होऊन, आपण धरलेली एकच वाट जगण्यात, धन्यता मानू लागतो. म्हणजे पूर्वी वाटतं की जगण्यात थोडा समतोल साधता आला की, या छोट्या छोट्या सुखाच्या गोष्टी पाहिजे तेव्हा करत जाऊ. आणि समतोल साधला जातोय असं वाटू लागलं की, वेळ पुरत नाही.
या पायावाटा पण दुसरं तिसरं काही नसणार. त्या वेळेचा हिशोब मांडत असणार. तुम्ही आज माझ्या वरून नाही चालत गेलात, तर उद्या तुम्ही चालालच याची काही शाश्वती नाही. कारण, आलेली वेळ आपण जगलो नाही, तर पुन्हा तीच वेळ येईल की, नाही याचा काही थांगपत्ता नसतो. समजा, टाइम मशीन मिळालंच आपल्याला तर आपण वापस जाऊन झालेल्या चुका पुन्हा नीट करू शकू का? महत्वाचं म्हणजे, आपल्या चुका समजून घेऊन भविष्य सुधरवायला महत्व आहे, भूतकाळ नाही.
त्यामुळे वेळ तर काढावाच लागणार, पायवाट आयुष्याचा समतोल साधत एकदा तरी चालावीच लागणार.

True and realizable.
ReplyDeleteFollow your new trail and get happy
Deleteछान. लिहीत रहा.
ReplyDelete☺️
Deleteखूप छान तेजल
ReplyDeleteTy 😊
Deleteखूप छान!
ReplyDeletethank u mummy!
Delete