डिअर जिंदगी

        "अब जैसे हू, पेहले नहीं थी में ऐसी|"

Maturity and motherhood made me physically available somewhere else and mentally at home. 

सततचे विनोद, नोकरीला लागल्यापासून कमी झालेय असं वाटतंय. की जोडीला कोणी नसतं म्हणून असं होतं काय माहित? Whatever... this election duty has made me to think twice about myself. 

       आणि त्यानंतर ड्युटी करतांना आलेले अनुभव असे की, एके काळी 'डिअर जिंदगी' हा सिनेमा मला मोठ्या लोकांच्या अडचणी सांगणारा वाटला होता. त्या मोठ्या लोकांच्या यादीत मी कधी जाईल असं मात्र वाटलं नव्हतं. आपले सामान्यांचे प्रश्न, अडचणी आणि उपाय सर्व काही मूलभूत गोष्टींजवळ आडतात असं वाटायचं मला. मग जेव्हा या मूलभूत मधलीच एक नोकरी लागते तेव्हा नैराश्येची व्याख्याच बदलते. तिथल्या वातावरणाने, कुणाच्या तरी असण्याने, कुणाच्या तरी नसण्याने पण खूप काही घडतं. Mid age crisis की काय हेच असावेत का? 

      आयुष्याची ऐकतीशी एकीकडे ओलांडताना दुसरीकडे हार्मोनल बदलही होत असेल का? म्हणजे आपण काय feel करतोय हे ह्या बियॉलॉजिकल घटकांवर ठरतंय की मनाला खरंच मार लागलाय 😄. जे असेल ते मी थेरपी म्हणून डिअर जिंदगी पाहावा असं ठरवतेय. मी स्वतःच एकेकाळी एक थेरपी होते आज मला परिस्थितीने एकटं पाडलंय, म्हणून असल्या थेरपी शोधतेय. ऑफिसात खूप बायका असणं हा उपाय नसू शकतो. खरंतर बायकांशी vibe न जुळणं हाच सर्वात मोठा अपाय आहे मला. 

      वरचे चारही उतारे वेगवेगळे भासतील, असे नैराश्यचे निराळे अनुभव आहेत 😁. आपण तेच आपले सततचे विनोद सुरु करावेत, पण सोबतच्यांना ते वागणं एका स्त्रीच्या लेखी शोभत नाही असं वाटावं. कधी कधी परिस्थिती आपल्याला अब जैसी हू पेहली नहीं थी, सारखं वागायला शिकवते. तर कधी कधी लोकं. आपला मूळ स्वभाव लपवून जगायचं म्हणजे ओळख न सांगताच ओळख करुन घेण्यासारखं आहे हे. 

      People do not deserve gem असं समजायचं आणि पुढे जायचं 😁. जाता जाता शाहरुखने सांगितलेले वेगवेगळ्या गोष्टींसाठी असलेले वेगवेगळे मित्रमैत्रीण आठवावेत. एकटेपणा वगैरे विसरावा कारण ही फक्त उणीव असते, वेगवेगळ्या गोष्टी करायला एकत्र नसलेल्या आपल्या सहकाऱ्यांची..अशावेळी आपलं काम बनतो आपला सहकारी. ☺️

Comments

  1. It's quite relatable, and I also agree that numbers don't matter, but the vibes do. ✨ Yes, sometimes we fall, but with every fall, we get inspiration to start again. 💪 Maybe the loneliness is just a misconception; being too practical leads to much isolation. 🤔 But one thing I learned today from this blog is that moving on without regrets is the key to a much healthier life. Thank you for writing this blog! 😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine