मळी ते सीमा तपासणी नाका

 रेल्वे प्रवासात, निफाड मार्गाने जातांना एकेकाळी मळीचा वास यायचा. काही वास, काही शहरांसाठी नेहमीच सुवास असतात. कारण त्यामुळे शहराची सुबत्ता राखून असते. मळी म्हणजे गूळ आणि साखर तयार करतांना उत्त्पन्न झालेला असा जड व काळसर पदार्थ, ज्यामध्ये आंबवता येण्याजोगी द्रवरूप साखर असते. निफाड साखर कारखान्याच्या, मळी सारख्याच घट्ट आठवणी तिथल्या प्रत्येकाला आहेत. 

      कारखाना चालू असतांना तर तिथला अनुभव नाही घेता आला. पण नोकरीच्या प्रशिक्षणानिमित्ताने, त्यातही नाशकात असलेल्या बऱ्यापैकी कारखान्यांमुळे, पुन्हा एकदा मळीकडे वळता आले. आपण गोष्टींकडे किती सहज बघतो. पण मानवाने सगळं काही तयार करतांना त्याचं नियमनही केलं आहे, ह्याची जाणीव मात्र कामाला लागल्यानंतर होते. माझे आता, मळीशी संदर्भात सर्व नियम समजून घेण्याचे दिवस सुरु झाले 😊. 

    मळी नंतर मद्यार्क (स्पिरिट) निर्मिती. मग स्पिरिटचे नियमही समजून घेणं आलं. स्पिरिट पूर्वी फक्त ऊसाच्या मळीने निर्माण करत. आता मात्र ऊसाच्या अभावापायी इतर धान्यांपासून निर्मित मळीपासून स्पिरिट बनवण्याची परवानगी शासनाने दिली आहे. यात मका, तांदूळ असे काही धान्यप्रकार आहेत. 

      Blending वरून आता मला captions सुचायला लागलेय, अशा पद्धतीने आयुष्य ब्लेंड होतंय 😁♥️. देशी दारू म्हटलं की, आणखी एक उग्र वास आठवायचा. आता मात्र खास blending kings कसं ह्या सर्व पारंपरिक मतांना छेद देत मद्यनिर्मिती करतात हे शिकायला मिळालं. 

     या अकार्यकारी प्रशिक्षणानंतर कार्यकारीकडे वळलो. पोलीस होता होता राहिलेले असं जर वाटत असेल तर ते स्वप्न कार्यकारी विभागात जाऊन पूर्ण होऊ शकतं. तपास, फिर्याद, पंचनामा, कलम, हातभट्टी, कोर्ट ते सीमा तपासणी नाका इत्यादी. 

असं शिकत समजून घेत, नोकरी काम नाही आयुष्य बनून जाते ☺️. 


Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine