कल्पना ढगांची
लहानपणी जसं 'दुनिया dairy milk की बन जाये रे' अशी fantasy, जाहिराती मधल्या लहान लेकरांना पाहून तयार व्हायची तसंच ढगांकडे पाहूनही त्यावर जाऊन नाचावं की काय अशी भन्नाट, unique आणि फ्लॉप आयडिया पण डोक्यात यायची.
जसं की, गाडीमध्ये बसल्यावर लांबच्या प्रवासात कधी असं झालंय? मस्त लोळत झोप लागलीये. उठल्यावर खिडकीबाहेर पाहिलं तर ढग खूप सुंदर दिसतायत. अगदी त्यांच्यावरून जाता येईल की काय असे 3D भासताय. ढग कशाचे बनतात हे माहीत नसेपर्यंत त्यांच्यावर मनातल्या मनात नाचून झालेलं असतं पण गोष्टींमागचं विज्ञान कळलं की, भ्रमनिरास होतो. म्हणूनच म्हणतात अज्ञानात सुख असतं. अज्ञानामुळे लहानपणी कल्पनाशक्ती कशी बहर घ्यायची! अगदी, आपण सर्वच टिपत राहतो त्या सुरेख ढगांसारखी!
Pictures are from different places and hence captured on very different days..
#sky
#thesedays
#monsoon
Comments
Post a Comment