"पाणी रे पाणी तेरा रंग.... "

       पाण्यासारखा बॉईलिंग पॉईंट (उष्मांक बिंदू)100°C असावा. उगीच लवकर तापून काही मिळत नाही. "पाणी रे पाणी तेरा रंग केसा.. जिसमे मिलादो, लगे उस जेसा." 

      किती प्रयत्न करतो आपण माणसं, जिथे जाऊ तसे होण्याचा पण प्रत्येक वेळी आपल्याला जमतंच असं नाही. समजा, जमणार असेल तर आपलंही महत्व पाण्याइतकंच अबाधित राहील. कितीही टिशू पेपर वापरला, तरी पाण्याशिवाय हात साफ झाल्याचं वाटत नाही, कितीही चवदार आणि रंगतदार खाल्लं किंवा पिलं तरी पाण्याची माहित नसलेली चव आणि बेरंगपणात असलेलं समाधान कशातच मिळत नाही. 

       असं होतं ना? कितीही माणसं असली आजूबाजूला, तरी त्या पाण्यागत नितळ व्यक्तीशी बोलल्याशिवाय आपलंही मन साफ झाल्याचं वाटत नाही. कितीही गप्पा ऐकल्या तरी, त्या एका व्यक्तीच्या बोलण्याशिवाय कानांना समाधानी लाभत नाही. 

अशी काही माणसं कधीकधी वेगळ्या IQ ची (बौद्धिक क्षमता) आणि EQ ची (भावनिक क्षमता) असतात तरीही आपल्यासारखी लोकं आजूबाजू नसल्याची खंत फक्त मनाशी ठेऊन जिथे आहेत तसे होण्याचा प्रयत्न करतात. 

"गंगा से जब मिले तो बनता गंगाजल तू पावन

बादल से तू मिले तो रिमझिम बरसे सावन"

असं प्रवाही, स्थिर आणि मग बरसणारी पाण्यासारखी माणसं...

     व्यवस्थापन (MBAचा) अभ्यास करणारा विद्यार्थी सोबतच्यांप्रमाणे नियमित महाविद्यालय करण्याऐवजी, आधीपासूनच उद्योगधंद्याला लागतो, मस्त चहाचा business करत, स्वतःसाठी टाइम्स ऑफ इंडिया आणि ग्राहकांसाठी सकाळ ही वृत्तपत्रे दुकानात ठेवतो. उगा कॉलेज लाईफ नाहीये म्हणून रडण्यापेक्षा हटके काहीतरी सुरुवातीपासूनच स्वतःचे क्षेत्र गाजवत 'जिसमे उतरा हू, लगू उस जेसा' अशा अविर्भावात जगण्याची ही कसोटी म्हणता येईल. 

        

Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine