सिलसिला

 असलेल्या गाण्याला संगीत देणं कठीण की असलेल्या संगीतासाठी गाणं लिहिणं कठीण? मुळात हा प्रश्नच गौण ठरतो, जेव्हा एका उत्कृष्ट संगीताचा आणि गीतकाराने लिहिलेल्या सुंदर गीताचा नजराणा आपल्यापुढे येतो. 

        काही वर्षांपूर्वी 'सकाळच्या सप्तरंगमध्ये' जगदीश खेबूडकर त्यांचे गीत लिहिण्याचे अनुभव मांडत असत. त्या वयात काय नवल वाटायचं, संगीत तयार असतांना त्यात शब्द भरून जादू ऐकवणाऱ्यांबद्दल. ही जादू जगदीश खेबूडकरांनी केली, आणखीही गीतकार करत असणार.. या सर्वांत विशेष कौतुक वाटलं ते जावेद अख्तरांचं.. 

        आपल्या सर्वांच्याच मनावर राज्य करणारं, 'संदेसे आते है' हे गाणं सगळ्यात शेवटी म्हणजे अगदी चित्रपटही पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लिहिलं. अर्थात संगीत तयार, सिनेमाची कहाणी तयार. आणि मग त्यांनी शब्दबद्ध केलं ते संदेसे.. 'ऐ गुजरने वाली हवा' सोबत आपल्यालाही उडायला लावणारे जावेद साहेब.. आपला साथीदार आपल्यापासून दूर असलेल्या प्रत्येकासाठी हे गाणं सर्वांत जवळचं. 

      अफरीन अफरीन, चालू असतांना 'जिस्म जैसे है अजन्ता की मुरत कोई' पहिल्यांदा ऐकलं तेव्हा कान फक्त ऐकण्याचं नाही, तर सौंदर्याला समजून घेण्याचंही काम करतात हे जाणवलं. आणि मग कळलं की, ही मूर्ती तर जावेद अख्तरांनी रेखाटली आहे. प्रत्येकच गीतकाराविषयी वेगवेगळ्या पद्धतीने ही भावना येतच असते. जसं, आनंद बक्षी, मजरुह सुलतानपुरी, साहिल लुध्यान्वी. 

      जाता जाता, जावेद साहेबांचा हा गीतांचा सिलसिला सुरु करण्याऱ्या 'सिलसिला' चित्रपटाविषयी... हा सिनेमा किती प्रसिद्ध आहे यापेक्षा त्यातलं 'देखा एक ख्वाब' हे गाणं आपल्या सगळ्यांनाच स्वप्नात नेऊन सोडणारं आहे. ट्युलीपची बाग, संगीत, गीत सर्वच ख्वाब आहे. यश चोप्रांनी जावेद यांना हे गाणं लिहा असं सांगितलं. पण मी पटकथा -संवाद लिहू शकतो. गाणी नाही, असं सांगून त्यांनी यश यांना आपला नकार कळवला पण यश चोप्रा मागे हटले नाही. त्यांनी खूप आग्रह केला म्हणून जावेद साहेबांनी 'देखा....' लिहिलं. आयुष्यातलं पहिलंच गाणं तेही आग्रहाखातर लाजवाब लिहिणारे जावेद साहब... स्वतःचा गीतकार आणि आपला त्यांचे चाहते म्हणून प्रवासाचा सिलसिला सुरु करणारं 'देखा एक ख्वाब......' निवळ 'मेरी सांसोमें बसी खुशबू तेरी' म्हणायला लावणारे.....

~तेजल. 


Comments

  1. This is a wonderful narration of the lyrics and melodies. The combination of beautiful words and expressive emotions truly touched my heart and immersed me in an ocean of endless musical melodies. It opened a door to the imaginative world of art and its creators. the best thing i have read today is this live full blog. Thank you ma'am...keep writing.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine