स्वातंत्र्यानंतरचा भारत भाग सहा
देशाची निर्मिती, निवडणुका, भाषा आणि त्यानुसार राज्ये िर्मिती आपण समजून घेतली. आता वेळ आली आहे नुकत्याच स्वातंत्र्य मिळालेल्या देशाची आर्थिक धोरणे समजून घेण्याची. सुरुवातीला जमीन सुधारणा, औद्योगिकरण, वीज निर्मिती, कालवे, आणि पायाभूत सुविधा यांना अनुसरून देशाचा आर्थिक पाया घातला गेला. ज्यात लोकशाही तत्वाने अधिकाधिक लोकसंख्या समाविष्ट होती. स्वातंत्र्यापूर्वी, १९३८ मध्ये राष्ट्रीय नियोजन समिती असायची. त्याच धर्तीवर नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली.
१९५० मध्ये गैर संविधानिक संस्था म्हणून नियोजन आयोग उदयास आली. सरकारच्या साध्या ठरावाने पास झालेली ही संस्था होय. नियोजन आयोगाकडे ५ वर्षांच्या आधारावर काम करण्याचे आव्हान सोपवण्यात आले. पंतप्रधान स्वतः या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष होते. या आयोगाच्या अहवालाला शेवटची संमती राष्ट्रीय विकास परिषदेकडून मिळत असे . ज्यास एनडीसी म्हटले जायचे. एनडीसीची स्थापना 6 ऑगस्ट 1952 रोजी केली गेली.
पहिला पंचवार्षिक आराखडा 1951-1956 या काळातला होता . जो हाररोड -डोमर यांच्या आखणीवर आधारीत होता . या जोडगोळीने देशाला गरिबीतून वर काढण्यासाठी योजना बनवली. त्यांनी जमीन विषयक सुधारणांना महत्व दिले. जसे की धरणे, पाटबंधारे, सिंचन इत्यादी.
पहिल्या नियोजन आयोगानुसार भाक्रा नांगल सारख्या प्रकल्पांना मंजूरी दिली गेली.
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पी सी महालनॉबिस यांचे योगदान होते. त्यांनी अवजड उद्योगांवर भर दिला. ह्या आखणीला आपण समाजवादी म्हणू शकतो कारण देशांतर्गत उद्योगांना मागणी यावी म्हणून सरकारने आयातीवरील कर वाढवला. तिसरा आराखडा फार वेगळा नव्हता पण फक्त शहरी विकासामुळे टीकेस पात्र मात्र ठरत होता. नेहरूंच्या मिश्र अर्थव्यवस्था धोरणामुळे शेती, व्यापार आणि उद्योग खाजगी क्षेत्रात ठेवण्यात आले. राज्याकडे अवजड उद्योग आणि पायाभूत उद्योग रचना तसेच व्यापार नियमन आणि शेतीत काही बदल करणे इत्यादी देण्यात आले. उजवे आणि डावे दोघांनी या मिश्र अर्थव्यवस्थेला विरोध केला.
काही टिकाकारांच्या मते, खाजगी क्षेत्राला पाहिजे तितका वाव आणि वाढ मिळाली नाही. परवाना पद्धतीमुळे भ्रष्टाचार बोकाळला असेही त्यांचे मत होते. याउलट, समाजवाद्यांच्या मते, लोकशिक्षण आणि आरोग्यावर योग्य खर्च झाला नाही. राज्याकडे असलेल्या गोष्टींमुळे नव मध्यम वर्ग उदयास आला, ज्यांना पगाराच्या मानाने कमी जबाबदारी व विशेषाधिकार मिळाले. असंही समीक्षक म्हणू लागले. यासर्वांसोबत, एक पायाभूत आधार उद्योगजगताला मिळाला हे दुर्लक्षित करून चालणार नाही.
भाक्रा नांगल, दामोदर खोरे परिषद, हिराकूड धरण इ. सिंचनासाठी आणि ऊर्जा निर्मितीसाठी उभारले गेले. अनेक अवजड उद्योग जसे की, स्टील, तेल शुद्धीकरण, लष्कर इ. सुरु झाले. या नवीन राष्ट्रात हिंदुस्थान मशीन, सिंद्री खते, चित्तरंजन रेल कारखाना, हिंदुस्थान प्रतिजैविके (antibiotios) उभे राहिले.
ही एक चळवळच मानली पाहिजे, नव्या भारताच्या उभारणीसाठीची. भाषावर राज्ये झाली, निवडणुका झाल्या, नियोजन आयोग बनला, आता आपण पुढील भागापासून भारताची वैज्ञानिक प्रगती जाणून घेऊ...
The combination of historical influences and contemporary situations provides a rich reflection of our evolution over time. However, we often overlook the important reality of unity amidst the diversity that characterizes our nation. India stands as a vibrant tapestry of various religions, traditions, and cultures, each contributing to the country's unique identity. In this beautiful amalgamation, it is essential to remember that our strength lies in our ability to celebrate these differences while embracing our shared values, thereby fostering a genuine sense of togetherness.
ReplyDeleteWe often admire developed nations for their prosperity, but we must recognize our potential as a "HUMAN RESOURCE" to transform INDIA. Instead of destructive criticism, we need constructive dialogue to create effective policies that work at the grassroots level. The past has taught us valuable lessons, and by drawing inspiration from it, we can build a cohesive nation that cares for every section of society.
ReplyDelete