वर्णभेद

 मुलगी उंच असली की जरा जास्तच उंच ए नाही, कमी उंच असली की थोडी आणखी उंची हवी होती नाही. जाड असली की, थोडी कमी हो ना, बारीक असली की खात पीत जा, तुला जेवायला देत नाही का (जेवण बनवता येतं, तर घेताही येईल ना. कोणी द्यायची काय गरज आहे.) तर असं शतकांपासून होतंच आलंय फक्त आता ऑनलाईन जगात embarrased करायला जास्त वाव मिळतो. 

    शरीरातल्या हार्मोनल लेवलनुसार आपलं शरीर आणि चेहरा दिसत असतो. त्यावरून भारतीय महिला खेळाडू Dutee Chand हिला 2014 साली ऑलिम्पिक समिती कडून अनेक प्रश्नोतरांचा सामना करावा लागला होता. कोणी तिला पुरुष म्हटलं, कोणी ट्रान्सजेन्डर म्हटलं. पण ती महिलाच आहे. 

   यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये Algerian खेळाडूला इटालियन खेळाडूकडून केल्या गेलेल्या दाव्यामुळे हे सर्व सहन करावे लागत आहे. युरोपातील राष्ट्रांनी या जगावर राज्य केलं, आज त्यांची मीडिया करत आहे. त्यातून काय घ्यायचं, काय नाही हे भारत आणि Algeria सारख्या देशांना समजले पाहिजे. इंस्टाग्रामवर brown history नावाचं पेज आहे, तिथे समजते की विकसनशील किंवा अविकसित देशांसोबत पश्चिमात्त्य देश काय वागतात. मेलोदी, I am sorry मेलोनी इटलीच्या राष्ट्रध्यक्षा (अर्थात उजवी विचारसरणी) स्वतःच्या खेळाडूसोबत उभे राहणे त्यांचे कर्तव्य आहे पण आधीच मुलगी म्हणून वडिलांचा रोष पत्करून पॅरिस पर्यंत पोहोचणाऱ्या इमेन खलिफचा संघर्ष समजून घ्यायला हवा. 

     जे. के. रोलिंगने आमचं बालपण आणि सगळं जीवन हॅरीच्या कथांनी समृद्ध केलं. पण या white mentality तून बाहेर यायला आणखी भरपूर वाट पाहावी लागणार आहे. 

Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine