लोकसभा 2024

 नेहमीप्रमाणे चार जूनला दिवसभर मोबाईल हातात कमीच घेतला, कारण पोरगं लगेच cocomelon लाऊन मागतो. पण लोकसभा 2024 निकाल म्हटल्यावर त्या दिवशी स्वतःला आणि पोरालाही थोडी सूट देऊ वाटत होती. इतका उत्साह आणला ह्या निकालाने. एकट्या बीजेपीच्या सीट्स, इंडिया अलायन्स पेक्षा जास्त असूनही का उत्साह? हा प्रश्न पडू शकतो. पण जे एका पार्टीला सत्तर वर्षात जमलं नाही - जगातील सर्वात श्रीमंत पार्टी होणं, ते ज्या पार्टीने पाच ते दहा वर्षात करून दाखवलं, अशा पार्टीला एकत्र येऊनच तर शह द्यावा लागणार होता. आणि अशा पार्टी विरुद्ध एकट्याने हरण्यापेक्षा किंवा अशा पार्टीचं एकहाती सरकार येण्यापेक्षा हे कधीही चांगलंच वाटणार. 

मागच्या टर्म मध्ये पोरांना मान्सून, विंटर सेशन शिकवताना बिल्स सरसकट चर्चा न करताच कसे पास होताय हे सांगावं लागायचं. आता सरकार अस्थिर जरी असलं तरी संसदेतली ही मुजोरगिरी तर थांबेल. 

     आयुष्यात माणसं बदलतात इथ पर्यंत ठीक होतं. पण कालपर्यंत शिंदे गटाचे असणारे माणसं आज प्रकाश वाजेंचं स्टेटस ठेवताय. कालपर्यंत मोदी मोदी करणारे, आपल्याला काय बाबा कोणीही आलं तरी रोजचं काम चुकणारे का? असं म्हणताय. म्हणजे भाई, तुम नितीश कुमारसे अच्छा राजनीती को समजते हो, असं म्हणू वाटतं यांना. (बरं, हा नितीश आज NDA चा ए, उद्या अविश्वास ठराव टाकायला कमी करणार नाही. but lets keep it aside).

    माणसं भित्री असू शकतात, पळपुटी असू शकतात. पण तीच माणसं संविधानिक पदावर असताना विक्षिप्त वागताना पाहून ध्रुव राठी mentally ill म्हणतो ते काय चुकीचं वाटत नाही. जिंकल्यानंतर प्रत्येक खासदाराने क्रेडिट देऊ केलंय , मग हरलेल्या खासदारांची जवाबदारी घेण्याची निर्भिड छाती पण असली पाहिजे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जिथे आपला फोटो असतो, तिथे अचानक सीट्स कमी होताना दिसू लागल्यावर पक्ष प्रमुखाचा फोटो येतो. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्यामुळे जगातला लोकप्रिय नेता स्वतःच्या देशातच स्व बुद्धीने विचार करणाऱ्या लोकांचं मन जिंकू शकत नाही.

    आपल्याला आपला धर्म कळला, म्हणजे आपला खूप अभ्यास आहे, असं काही netizens ना वाटतं. पण बेटा, ज्यांच्यासाठी everything is game आहे, त्यांच्यासाठी एक्झीट पोल स्कॅम काही विशेष नाही. इतका साधा अभ्यास नसल्याने, आपले शेअर मार्केट मध्ये पैसे जाताय तर आपण ह्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या राजकारणावर कोणत्या आत्मविश्वासाने बोलतो? Privatization चं समर्थन घरात येणारा पब्लिक सेक्टरचा पैसा वापरून करतो. सगळीच सरकारी व्यवस्था खराब असती, तर हा देश कधीच तुटला असता. व्यवस्थेचा जो भाग खराब आहे, तो खाजगीत जास्त पटींनी आहे, शिवाय तिथे liability पण कमी आहे.

     >>यूपीच्या लोकांपेक्षा आरसीबी फॅन्स चांगले आहेत<< dude, भारतात स्वतःला हिंदू मानणारे, रामाला मानणारे यांनी सर्वांनी राम मंदिर उत्सव जोरात साजरा केला पण BJP म्हणजे हिंदुत्व ही त्या हिंदूंची व्याख्या नाही. आणि ती तुम्ही शिकवू पण नका. राम मंदिर हा emotional quotient होता, तर आचारसंहितेपूर्वी मनाचा उत्सव साजरा झालेला होता. आता वेळ आली होती, ती पोटाच्या उत्सवाची. मुंबईत टॅक्सी चालवणारी एकही उत्तर भारतीय व्यक्ती ह्यांच्यावर खूश नव्हती. मराठी माणसंही तितकीच शिव्या घालत होती. नवऱ्याला ट्रेन मध्ये भेटणारे स्वतः हून किती नाराज आहेत सांगत होते. you tube वर videos available आहेत की, का अयोध्येत असा निकाल लागला? ते बघूनही सेन्सेस जागे होत नसतील, तर गर्वाने आपण अंधभक्त आहात याची कबुली द्या.  

     नाशिकला, दोन टर्म्स जात आणि लाट जोरात होती. तिसऱ्यांदा मात्र घाट दाखवायचा होता. आपण ना जातीच्या कामी आलो, ना शहराच्या, ना शहरवासीयांच्या. मग फक्त उतावीळ होऊन धर्मासाठी निवडून द्यायला आम्ही नाशिककर काय तिथल्या वातावरणासारखे थंडे नाहीत. त्यात यंदा मरणाची गरमी होती. मग तापतच मतदान केलं. मोदींना नाही एवढी लीड मिळवून दिली राजाभाऊंना. आता फक्त राजासारखेच जनतेच्या कामी येतील ही अपेक्षा. कांदा प्रश्नाचंही तसंच. साठा नव्हता म्हणून निर्यातबंदी केली होती - is this your explanation? मग, तुम्ही आता येऊच नका, explanation तर गुरुजीच चांगले देऊ शकतात. त्यांना आणतो आम्ही, असं म्हणत जनतेने भगरे गुरुजी निवडून आणले दिंडोरी लोकसभा मतदार संघातून. (भगरे अशाच आडनावाचा इसम, तुतारी सदृश्य पिपाणी निशाणी घेऊन लढला. त्याच्या घराशेजारी सुद्धा माहित नाही की, हा निवडणूक लढतोय. आणि ह्या घडीला तो गायब आहे, हा विनोद नव्हे 😁. तरी बरं, अशा पद्धतीने गुरुजींचे एक लाखावर मत खाऊनही ते निवडून आले.) 

      बाकी, अटलजींना तुम्ही seriously नाही घेतलं मग आम्हीच घेतलं -

सरकारें आएंगी, जाएंगी पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी मगर यह देश रहना चाहिए इसका लोकतंत्र अमर रहना चाहिए !!!

सरकार कोणतंही बनो, we won't stop questioning and we have an experience - पैसे फेकलेल्या आयटी सेल सारखे गुंडगिरी करत उत्तरं देत नाहीत हे. दिले तर ह्यांना पण पुढच्या टर्मला दणका देताच येईल. 

पण आशा फक्त ह्यामुळेच आहे कारण, नफरत की बाजार में, मोहब्बत की दुकान यांच्याकडे होतं.

TD

Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine