मराठी तोरण आणि SoBo
मराठीची प्रत्येक बोलीभाषा मराठीला आणखी समृद्ध करते.
पण पुण्यात आणि मुंबईत राहिल्यानंतर प्रमाणभाषेबद्दल वाटलेली एक गोष्ट म्हणजे पुण्यापेक्षा मुंबईत जास्त अस्खलित मराठी बोलतात. एकदम अलंकारिक भाषा, वाक्यप्रचार, म्हणी असं सगळं मराठी व्याकरण लहानांपासून मोठेही वापरत असतात.
आम्ही नाशिककर यावर फक्त "इ भाई, डायरेक्ट टीव्हीमधली मराठी ना. विषयच खोल ए यांचा." असं म्हणून खूश होतो. आणि एवढ्या विविधतेने बोलल्या जाणार्या मायबोलीवर आणखी प्रेम जडत जातं.
हे मी मागच्या वर्षी
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने लिहिलं होतं आणि काल महाराष्ट्र दिन. तेव्हा
मला आम्ही मुंबईत राहत असलेल्या बिल्डिंग मधल्या एका घराचं दार आठवलं. त्याचा फोटो
अपलोड केलाय. या दोन गोष्टींचा संबंध असा की, सगळं जग बदलतंय, "aesthetic हवं सर्व
असं" म्हणत आपली घरं सजताय. पण हा SoBo (South Bombay - दक्षिण मुंबई) मधल्या एका
दाराचा फोटो. तिथलं तोरण जुन्या मराठी घरांची आठवण करून देतंय.सोबो मध्ये
वेगवेगळ्या ठिकाणी भाषा सुद्धा किती बदलली.. पण त्याच सोबोत मराठी संस्कृती
वेगवेगळ्या ठिकाणी अशी दिसूनही येत असते.
संस्कृतीचं, रूढी आणि परंपरांसारखं नसतं.
आला एक विशिष्ट दिवस की पाळायच्या. संस्कृती रोज जपण्यासारखी शिवाय लिंग निरपेक्ष
आहे. रूढी परंपरा मात्र घरातल्या कोणा एकावरच आपलं जोखड टाकतात. संस्कृती तशी सर्वच
बाबतीत निरपेक्ष आहे, जेवढी जपाल तेवढी जपेल. रूढी परंपरांसारखी नाही, जेवढी थोपाल
तेवढी टिकेल...
(P.S - खूप दिवसांनी, कदाचित आई झाल्यानंतर पहिल्यांदा काहीतरी
पोस्ट करतेय.)

Congratulations on p.s.🎉🎊
ReplyDeleteThank u
Delete