गोष्ट विषारी!
एखादी छोटी गोष्ट मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेते. जसं की, 'राझी' मध्ये सहमतने वापरलेली Ricin. आपल्या नवर्याच्या मोठ्या भावाला मारण्यासाठी ती सेम त्याच पद्धतीने Ricin वापरते ज्या पद्धतीने जगात पहिल्यांदा या विषाचा वापर केला गेला होता. म्हणजे छत्रीमधून Ricin inject करते. पण जगाच्या इतिहासात Ricin पहिल्यांदा 1978 मध्ये वापरली गेली असं आपल्याला इतिहासही सांगतो आणि ब्रेकिंग बॅड मध्ये Walt सुद्धा Jesse ला सांगतो तेव्हाही आपण ऐकतो. आणि सहमतची घटना साहजिकच त्या आधीची आहे कारण तो भारत पाकिस्तान संघर्षांमधला बांगलादेश मुक्तीच्या वेळचा अर्थात 1971 चा काळ आहे.
इथे मेघना गुलजार यांनी तेवढी liberty वापरली असणार. आशुतोष गोवारीकर यांनी 'जोधा अकबर' चित्रपटात Ricin वापरले आहे. जे महाम अंगा यांना राणी जोधा कडे सापडते. त्या आवई उठवतात की, हे राणी जोधाने शहेनशाह अकबराला मारण्यासाठी आणलेय. प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासात Ricin विष प्रयोग झालाही असेल पण ठोस पुरावा फक्त आधुनिक तोही शीत युद्धाच्या पूर्वीचा काळ देतो. Bulgaria च्या जॉर्ज मार्कौव् या पत्रकाराला मारण्यासाठी KGB या सोविएत युनियनच्या सरकारी संघटनेने छत्री मधून Ricin inject केले होते. चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. आजही ज्यावर इलाज नाही, त्यावर 1978 मध्ये अपेक्षाच नाही. त्यातही inject केल्यास हमखास 4-5 दिवसात मृत्यू होतोच. सहमतचा जेठ त्याच दिवशी गेलेला दाखवला पण ठीके आपल्याला तेव्हा स्टोरी प्लॉटशी घेणं होतं. ब्रेकिंग बॅड मध्ये Walt, Lydia ला Ricin inject न करता तिच्या Stevia साखरेत टाकतो म्हणजे ingest करण्यास भाग पाडतो. Inject केल्यानंतर हमखास मरण येते. Ingest केल्यानंतर जर लक्षात आलं आणि योग्य ट्रीटमेंट मिळाली तर कदाचित विषाची intensity कमी होऊ शकते. पण Lyndia ची लक्षणे inject केल्यासारखी दाखवली आहेत आणि इथेही आपल्याला स्टोरी प्लॉटशीच घेणं. तर असं हे छोटंसं Ricin '78 घटना सोडली तर बाकीकडे नुसतं entertain करतं.
(एरंडेल तेल बनवताना उरलेल्या अर्कापासून बनवलेले Ricin आपल्या सेल membrane मधल्या ribosome ला सांगते की, "stop forming more proteins". मग हे proteins बनले नाही तर सेल्स मरतात आणि आपले organ फेल होतात.)



Examples used in this blog are too good. Except 1 rest all are known which enhance the interest 👍
ReplyDeleteThanks Kajal.
ReplyDelete