चंद्र आणि आपण!

   


      आपण मनुष्य स्वतः खूप गोष्टी बनवतो. पण त्यामुळे नैसर्गिक गोष्टींचं आपल्याला लागलेलं येड काही कमी होत नाही. एकदा ढग बघितल्यावर कसे मनात अशक्य विचार येतात, हे लिहिलं होतं.  - इथे क्लिक करा 

     आज अशाच आपल्या सगळ्यांनाच खिळवून ठेवणाऱ्या चंद्रा विषयी नाही, पण त्याला पाहून जे होतं त्या विषयी लिहू वाटलं. खरं, प्रत्येक वेळी प्रत्येकाला वेगवेगळं वाटत असतं. जसं प्रत्येकाचं अवकाश वेगळं, तसा प्रत्येकाचा चंद्र आणि त्याला पाहून येणारा विचार पण वेगळा. 




    एकदा चंद्राच्या प्रकाशात एकदम भूतकाळ आठवला. तोच भूतकाळ जो माझ्या आजूबाजू असणाऱ्या प्रत्येकालाच माहीत आहे. तरीही वेळेसोबत मागे पडलेल्या किंवा आपण मागे सोडून आलेल्या गोष्टी, ज्यांच्या सोबत जगलो त्यांच्याच सोबत पुनः बोलल्याने कसलं भारी वाटतं. भूतकाळात घडलेल्या गोष्टींना वर्तमानात सहसा फारसं महत्व नसलं तरी, त्या त्या वेळी आपल्या आयुष्याला काय किंमत होती याची जाणीव होते. जिथे की आज आपण स्वतःच्या नजरेत जास्त महत्वपूर्ण असतो. पण जग आज त्यामानाने पावलोपावली आपली किंमत काढत असतं.              
       कसं ना.. एवढा मनमोहक चंद्र तो! पण त्याला पाहून एकाच वेळी तितकेच सुंदर आणि स्वतःला विचारांच्या जाळयात ओढणारे विषय आठवू शकतात. कधी कधी तर नुसते पाहत राहावे असा, त्याच्या नावाने लिहिलेले गाणे त्याच्याचकडे पाहून गुणगुणावे असा. तुम्ही चांद राती काय करता? प्रत्येक selenophile व्यक्ति अशीच वाहत असेल का त्याच्यासोबत?

 #selenophile #selenophile person #selenophile a person who loves the moon #selenophile गाना #selenophile चे फायदे #selenophile थीम #selenophile थॉट #i_am_selenophile

Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine