Posts

Showing posts from August, 2022

चंद्र आणि आपण!

Image
          आपण मनुष्य स्वतः खूप गोष्टी बनवतो. पण त्यामुळे नैसर्गिक गोष्टींचं आपल्याला लागलेलं येड काही कमी होत नाही. एकदा ढग बघितल्यावर कसे मनात अशक्य विचार येतात, हे लिहिलं होतं.  -  इथे क्लिक करा       आज अशाच आपल्या सगळ्यांनाच खिळवून ठेवणाऱ्या चंद्रा विषयी नाही, पण त्याला पाहून जे होतं त्या विषयी लिहू वाटलं. खरं, प्रत्येक वेळी प्रत्येकाला वेगवेगळं वाटत असतं. जसं प्रत्येकाचं अवकाश वेगळं, तसा प्रत्येकाचा चंद्र आणि त्याला पाहून येणारा विचार पण वेगळा.      एकदा चंद्राच्या प्रकाशात एकदम भूतकाळ आठवला. तोच भूतकाळ जो माझ्या आजूबाजू असणाऱ्या प्रत्येकालाच माहीत आहे. तरीही वेळेसोबत मागे पडलेल्या किंवा आपण मागे सोडून आलेल्या गोष्टी, ज्यांच्या सोबत जगलो त्यांच्याच सोबत पुनः बोलल्याने कसलं भारी वाटतं. भूतकाळात घडलेल्या गोष्टींना वर्तमानात सहसा फारसं महत्व नसलं तरी, त्या त्या वेळी आपल्या आयुष्याला काय किंमत होती याची जाणीव होते. जिथे की आज आपण स्वतःच्या नजरेत जास्त महत्वपूर्ण असतो. पण जग आज त्यामानाने पावलोपावली आपली किंमत काढत अस...

2 ऑगस्ट आणि दादरा नगर हवेली

ऑगस्ट म्हटलं की, सगळ्याच भारतीयांचा ऊर अभिमानाने आणि आनंदाने भरून येतो. पण दादरा आणि नगर हवेली मधल्या नागरिकांना याच महिन्यात हे क्षण दोनदा अनुभवता येतात. असं काय कारण असेल ज्यामुळे मी हे लिहतेय? कारण, दादरा आणि नगर हवेलीचा 2 ऑगस्ट 1954 हा पोर्तुगीजांपासून स्वतंत्र होण्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी 61 वर्षांपूर्वी हा केंद्रशासित प्रदेश भारतात विलीन झाला आणि त्याआधी सात वर्षांपूर्वी पोर्तुगीजांपासून हा प्रदेश मुक्त झालेला होता, खरं म्हणजे ‘झाला नाही’ तर ‘मुक्त केला होता’. आज तो दमण आणि दीव सोबत भारताचा 8वा केंद्रशासित प्रदेश म्हणून गणला जातो. कारण दमण आणि दीव मध्ये विलिनीकरणाची ही प्रक्रिया 2020 मध्ये अवलंबवण्यात आली. म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाख यांच्या केंद्रशासित प्रदेश बनण्याच्याही नंतरचा हा प्रसंग. म्हणून आपण या विलीनीकरणाला शेवटचे आणि आठवे केंद्रशासित प्रदेश म्हणूया. तर आजच्या तारखेच्या महत्वाला अनुसरून आपण दादरा आणि नगर हवेलीचा 26 जानेवारी 2020 पर्यंतचा दमण आणि दिव मध्ये विलीन होण्याचा प्रवास समजून घेऊ. सामान्यतः दादरा नगर म्हटलं की आपल्याला पोर्तुगीज आणि त्याहीपूर्व...