स्वातंत्र्यानंतरचा भारत भाग चार

     

post independence period in india

Image source

मागच्या ब्लॉग मध्ये निवडणुकांविषयी समजून घेतल्यानंतर आता आपण वळत आहोत, भारतातील राजकीय पक्षांकडे.. 

काँग्रेस पक्षाला सर्वमान्य मानले गेले असेल तरी , अन्य काही पक्ष उभारी घेऊ लागले होते. नेहरू सरकारच्या अंतर्गत उद्योगमंत्री ( संदर्भ ) असलेले श्यामा प्रसाद मुखर्जी ऑक्टोबर 1951 मध्ये भारतीय जन संघ बनवण्यासाठी काँग्रेस मधून बाहेर पडले. जे बी कृपलानी यांनी किसान मझदूर संघाची स्थापना केली. राम मनोहर लोहिया आणि जय प्रकाश नारायण यांनी समाजवादी पक्ष बनविण्यावर भर दिला. भीमराव आंबेडकरांनी सुद्धा Schedule Caste फेडरेशनला नव्या जोमाने पुढे आणले व नंतर रिपब्लिक पार्टी असे या पक्षाचे नाव केले. तत्कालीन एकत्रित Communist ( साम्यवादी) पक्षाने तेलंगणा मध्ये शस्त्रास्त्रे त्यागून वरील पक्षांप्रमाणेच निवडणूक लढली. 

      अशा पद्धतीने पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ५३ राजकीय पक्षांनी सहभाग घेतला. निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार, १४ राष्ट्रीय पक्ष होते. १८७४ उमेदवारांपैकी ५३३ अपक्ष होते.

जाणून घेऊ, राष्ट्रीय पक्षांची नावे -

१. अखिल भारतीय जन संघ (BJS)

२. भारतीय बोलशेविक पक्ष (BPI)

३. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI)

४. फॉरवर्ड ब्लॉक (मार्क्सिस्ट)

५. फॉरवर्ड ब्लॉक (रुईकर)

६. अखिल भारतीय हिंदू महासभा

७. भारतीय काँग्रेस पक्ष

८. कृषीकर लोक पक्ष

९. किसान मझदूर प्रजा पक्ष

१०. भारतीय रिवॉल्युशनरी कमुनिस्ट पक्ष

११. अखिल भारतीय राम राज्य परिषद 

१२. रिवॉल्युशनरी समाजवादी पक्ष

१३. अखिल भारतीय अनुसूचित जाती फेडरेशन 

१४. समाजवादी पक्ष.

Also read - भाग दुसरा

निवडणुकांमध्ये येणारी आव्हानं, पक्ष आपल्याला माहीत झाले. आता समजून घेऊ. प्रत्यक्ष निवडणुका..

प्रत्येकी हजार मतदारांना २,२४,००० पोलिंग बूथ होते. मतदान करून झाल्यानंतर बोटाला शाही लावण्याची पद्धत तर तेव्हापासून आज पर्यंत चालू आहे. ४५.७% मतदान झाले त्यात फक्त ३-४% मतदान अवैध होते. 

यानंतर वळूया निकालाकडे - काँग्रेसने लढवलेल्या ४७२ जागांपैकी त्यांना ३६४ जागांवर विजय मिळाला. दोन आकडी जागा मिळवणारे दोनच पक्ष होते आणि ते म्हणजे CPI-१६ व समाजवादी पक्ष - १२. किसान मझदूर पक्षाला ९ जागा मिळाल्या. भारतीय जन संघ तीन जागा जिंकू शकला. काँग्रेस नंतर अपक्ष उमेदवारांना जास्त जागा जिकंता आल्या. 

Also read - भाग तिसरा

काही प्रसिद्ध विजेते उमेदवार होते - भावी पंतप्रधान गुलझारी लाल नंदा, व लाल बहादूर शास्त्री. 

दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री चौधरी ब्रहाम प्रकाश इ.

बॉम्बे (उत्तर मध्य) आरक्षित मतदारसंघात आंबेडकर काँग्रेसी नारायण सदोबा काजरोळकर यांच्या विरुद्ध हरले. त्यानंतर त्यांनी राज्यसभा उमेदवार म्हणून संसदेत प्रवेश केला. जे बी कृपलानी विजय मिळवू शकले नाही पण त्यांची पत्नी सुचेता कृपलानी या दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या मनमोहिनी सहगल यांचा पराभव करू शकल्या. 

निकालानंतर २ एप्रिल १९५२ला पाहिली लोकसभा झाली. तत्पूर्वी, भारतीय संविधान सभाच अंतरिम सरकार म्हणून काम बघायची हे सगळ्यांना ठाऊक आहे. 

लोकसभेचे पहिले स्पीकर - जी. व्हि. गवळणकर हे झाले.

अनेक राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाचेच सरकार स्थापले गेले. अपवाद - मद्रास, त्रावणकोर - कोचीन, ओडिशा, आणि PEPSU (पंजाब अँड ईस्ट पंजाब स्टेटस युनियन).


आज आपण निवडणुका जाणून घेतल्या. पुढील ब्लॉग मध्ये या पुढचा प्रवास समजून घेऊ. 


स्वातंत्र्यानंतरचा भारत निबंध.  

post independence india upsc

post independence india history

post independence in india

post independence period in india

post independence land reforms in india

post independence of india



Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine