अनिवासी भारतीय भारतात मालमत्ता घेऊ शकतात का?

      

nri buy property in india

 Image source


जसं २०१९ मध्ये, भारतीय आता काश्मीर मध्ये जमीन विकत घेऊ शकतील अशा चर्चा ऐकू येऊ लागल्या.. तसंच, अनेकांना असेही प्रश्न पडतात की, भारताबाहेर राहत असलेली पण भारताचे नागरिकत्व असणारी व्यक्ती भारतात स्वतःच्या मालकीची जमीन विकत घेऊ शकते का?

तर, उत्तर आहे हो. मग नक्की कशा पद्धतीने ही जमीन विकत घेता येऊ शकते? यासाठी, काय नियम व अटी आहेत? हे आज आपण या ब्लॉग मधून समजून घेणार आहोत?

तत्पूर्वी, जाणून घेऊ फेमा (FEMA- Foreign Exchange Management Act) काय आहे? कारण, या कायद्यानुसार अशा अनिवासी भारतीयांच्या मालकी हक्कांची अंमलबजावणी होत असते. या कायद्याअंतर्गत नागरीक भारताचा पासपोर्ट धारण करतो/करते की नाही हे समजते. FEMA चे प्रशासन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बघते. परंतू, प्रत्येक वेळी RBI ची परवानगी घेणे FEMAस बंधनकारक नसते. विदेशात गेलेले भारतीय FEMA च्या माध्यमातून भारतात पैसे पाठवत असतात.  

    अनेकदा विचारला जाणार प्रश्न असा की, अनिवासी भारतीय भारतात स्वतःच्या मालकीची जमीन घेऊ शकतात का? तर, यातला अनिवासी भारतीय हा शब्द त्या नागरिकांना लागू होतो, हे कायमसाठी दुसऱ्या देशात गेले नसून काम करण्यासाठी विदेशी राहत आहेत. ते भारताचे नागरिकच असतात. सहा महिन्यांपेक्षा जास्त वास्तव्य अन्य देशांत झाल्यास अनिवासी भारतीय ही ओळख अशा नागरिकांची तयार होत असते. आपल्या कडे या नागरिकांना घेऊन खूप गैरसमज आहेत. असंही हल्ली देश परिस्थितीवर खरं बोलल्यास तुमचे देशावर प्रेम नसल्याचे सांगितले जाते. तेव्हा ही स्वतःच्याच देशाच्या GDP ला हातभार लावणारी माणसं असली तरी त्यांना बरीच समाजमान्य बोलणी खावी लागतात. 

एक मात्र विसरायला नको. वाजपेयींच्या काळात परमाणू चाचणी नंतर जेव्हा अमेरिकेने भारताच्या दळण वळणावर बंधने आणली, तेव्हा याच अनिवासी भारतीयांनी पैसे पाठवून देशाची मदत केली होती. 

मुख्य मुद्द्याकडे वळतांना- उत्तर हो असे असेल. म्हणजेच अनिवासी भारतीय भारतात स्वतःच्या मालकीची जमीन खरेदी करू शकतात. फक्त, ही जमीन राहण्यासाठी, व्यवसायासाठी त्यांना वापरता येईल. अनिवासी भारतीय भारतात शेतीसाठी, फॉर्म हाऊस साठी जमीन घेऊ शकत नाही. अगदी, त्यांना या कारणासाठी कोणी जमीन भेट जरी दिली तरी ते अशी जमीन घेऊ शकत नाही. परंतू, शेतीसाठी, फॉर्म हाऊस साठी वंशपरंपरेने जमीन मिळाल्यास ती जमीन अनिवासी भारतीयांच्या मालकीची होऊ शकते. 

बऱ्याचदा, अनेक अनिवासी भारतीय भारतात जमीन घेऊ इच्छितात. आपण पाहिले की ते कामासाठी परदेशी गेलेले असतात. परंतू, कायमस्वरूपी ते तिथे राहणार नसल्याने जेव्हा परततील तेव्हा स्वतःची किंवा कुटुंबाची सोय म्हणून हे नागरीक भारतात जमीन घेऊ इच्छितात. 

जे परदेशी नागरीक अनिवासी भारतीयांशी लग्न करतात. ते  भारतात त्यांच्यात सोबत मालमत्ता विकत घेऊ शकतात. अशी मालमत्ता एकट्या विदेशी नागरिकाच्या मालकीची होऊ शकत नाही. ती एक जॉइंट प्रॉपर्टी बनते. यात देखील अकरा देशांचा अपवाद आहे. म्हणजे, खाली दिलेल्या देशातील व्यक्तीने अनिवासी भारतीय व्यक्तीशी लग्न केले असले तरी देखील या खालील देशांतील व्यक्तींना अशी एकत्रित अर्थात जॉइंट प्रॉपर्टी विकत घेता येणार नाही. -

पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, चीन, इराण, नेपाळ, भूतान, मकाऊ, हाँगकाँग, आणि दोघे कोरियन देश.. 


अशा पद्धतीने अनिवासी भारतीय आणि त्यांची भारतातील जमीन मालकी याविषयावरील शंकाचे निरसन झाले असेल, अशी मी आशा व्यक्त करते.

nri buy property in india

can nri buy property in india

if nri buy property in india

buying property in india as nri

nri buying agricultural property in india

can a nri purchase property in india

can a nri buy agricultural land in india

can a nri buy land in india

buying property in india by nri

can nri purchase property in india

nri buying commercial property in india

why do nris buy property in india

Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine