ऑस्करच्या शर्यतीत भारताचा बिट्टू हा लघुपट | Bittu Shortfilm Nominated for Oscar

  ऑस्करच्या शर्यतीत भारताचा बिट्टू हा लघुपट | Bittu Shortfilm Nominated for Oscar

 'जलिकटटू ' हा ऑस्करमधील भारताकडून असलेल्या फीचर फिल्म या कॅटेगरीतून बाद झाल्याची बातमी काल वाचली. परंतु, उत्कृष्ट लघुपट प्रवर्गात ' बिट्टू ' या लघुपटाचे टॉप टेन मध्ये नामांकन झाल्याचे समजले. पुढील टॉप फाईव साठीची फेरी पाच मार्च रोजी आयोजित होणार असल्याचे समजले. या पार्श्वभूमीवरच हा लघुपट काल Youtube वर देखील टाकण्यात आला असावा. पण दिग्दर्शिका करिश्मा डूबे यांनी कॉपीराइट क्लेम केल्यानंतर काही Channels वरून काढण्यात आला. 

 

Bittu Shortfilm Nominated for Oscar

 

   ' बिट्टू ' २०१३ साली बिहार मध्ये प्राथमिक शाळेत घडलेल्या सत्य घटनेवर आधारित १६.५७ मी. चा लघुपट आहे. 

आयुष्याचे अविभाज्य घटक - मैत्री आणि मरण. वय कोणतंही असो, मैत्री असली की, जगणं समृद्ध आहे हे समजतं नसलं तरी अनुभवता येतं. तसंच मरण काय असतं, हे समजत नसलं तरी ती पोकळी जाणवत असते. 

   सरकारी शाळांची सकारात्मक बाजू म्हणजे ' बिट्टू ' मधील सर आहेत. आणि नकारात्मक बाजू म्हणजे तेथील मुख्याध्यापिका दाखवल्या आहेत. ऐकण्याची क्षमता असली की, समोरच्याचं समजतं सुद्धा आणि त्या नंतर समोरच्याला आपलं पटवून देखील देता येतं. पण मीपणा वाला अहंकार स्वतःसोबत इतरांनाही घेऊन बुडतो, हे पुन्हा एकदा या लघुपटातून अधोरेखित झालं. 

    'अच्छे बच्चे कैसे होते है? ' याचं उत्तर देता देता निष्काळजीपणामुळे तोच शेवट ठरणार आहे, हे तरी कोणाला माहित होते..

 

Also  Read : Lady Driver 

लघुपटात खऱ्या भारताचे प्रतिनिधित्व करणारं खेडे दाखवले आहे. हिमालयातील हे छोटं गाव ही ' बिट्टू ' ची आणखी एक जमेची बाजू आहे. आपण सगळे चमचमत्या दुनियेत राहतो. मोबाईलवर ही शॉर्टफिल्म पाहू शकतो. पण बिट्टू आणि तिचे सवंगडी या सगळ्या पासून खूप दूर आहे. तिच्या वर्गातले इतर विद्यार्थी विद्यार्थिनी आणि चांद व बिट्टू या दोन मैत्रिणींच्या राहणीमानातील असमानता ही सुद्धा एखाद्या विकसनशील देशात नावालाच असणाऱ्या समानतेसारखी आहे. बिट्टू कडे पाहतांना नागराज मंजुळे यांच्या कलाकृतीमधील एखादा नायक आठवल्याखेरीज होत नाही. आणि बिट्टूचं हेच नैसर्गिक असण सर्वाधिक भावतं. बाकी बिट्टू हे character कसं आहे, हे लघुपटातच पाहणं उपयोगी ठरेल. 

बिट्टूची लिंक ब्लॉग मध्ये शेअर केली आहे.

 Also Read :आदिवासी संस्कृती , महिला आणि आपण..


Watch a shortfilm here -

https://youtu.be/w-H7ZNA-axo


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine