ऑस्करच्या शर्यतीत भारताचा बिट्टू हा लघुपट | Bittu Shortfilm Nominated for Oscar
ऑस्करच्या शर्यतीत भारताचा बिट्टू हा लघुपट | Bittu Shortfilm Nominated for Oscar ' जलिकटटू ' हा ऑस्करमधील भारताकडून असलेल्या फीचर फिल्म या कॅटेगरीतून बाद झाल्याची बातमी काल वाचली. परंतु, उत्कृष्ट लघुपट प्रवर्गात ' बिट्टू ' या लघुपटाचे टॉप टेन मध्ये नामांकन झाल्याचे समजले. पुढील टॉप फाईव साठीची फेरी पाच मार्च रोजी आयोजित होणार असल्याचे समजले. या पार्श्वभूमीवरच हा लघुपट काल Youtube वर देखील टाकण्यात आला असावा. पण दिग्दर्शिका करिश्मा डूबे यांनी कॉपीराइट क्लेम केल्यानंतर काही Channels वरून काढण्यात आला. ' बिट्टू ' २०१३ साली बिहार मध्ये प्राथमिक शाळेत घडलेल्या सत्य घटनेवर आधारित १६.५७ मी. चा लघुपट आहे. आयुष्याचे अविभाज्य घटक - मैत्री आणि मरण. वय कोणतंही असो, मैत्री असली की, जगणं समृद्ध आहे हे समजतं नसलं तरी अनुभवता येतं. तसंच मरण काय असतं, हे समजत नसलं तरी ती पोकळी जाणवत असते. सरकारी शाळांची सकारात्मक बाजू म्हणजे ' बिट्टू ' मधील सर आहेत. आणि नकारात्मक बाजू म्हणजे तेथील मुख्याध्यापिका दाखवल्या आहेत. ऐकण्याची क्षमता असली की,...