स्वातंत्र्यानंतरचा भारत भाग २ | India After Independence in Marathi Part 2

 स्वातंत्र्यानंतरचा भारत भाग २ | India After Independence in Marathi Part 2

भारतीय संस्थाने यांचे क्षेत्रफळ ७ लाख १२ हजार ५०० आठ चौरस किमी इतके होते. या संस्थांनांची संख्या ५६२ पेक्षा कमी नव्हती. संस्थांनातील लोकसंख्या ऐकून तुम्हाला नवल वाटेल. पण हे खरे आहे की बिलबरी सारख्या छोट्या राज्याची संख्या अगदी २६ इतकीच होती आणि मोठ्या राज्यांची संख्या १४ दशलक्ष एवढी होती. जसे की, इटली देशाएवढे असणारे हैदराबाद हे राज्य उदाहरणादाखल घेता येईल. ब्रिटिशांनी नैसर्गिक स्रोतांनी युक्त असा सर्व प्रदेश स्वतः च्या ताब्यात घेतला होता. भारताकडे मात्र उपयुक्त शून्य असे राज्य उरले होते.

 

India After Independence in Marathi Part 2
India After Independence in Marathi Part 2

 

 

सरदार पटेल ज्यांच्याकडे राज्य विस्थापणाचे मंत्रिपद होते, त्यांनी V. P Menon यांच्या मदतीने ( V. P. Menon हे मंत्रिमंडळातील सचिव होते) संस्थांनाच्या राजा महाराजांना देशभक्तीच्या जाणिवेने भारतात यावयास सांगितले तसेच आजवर ब्रिटिशांच्या अखत्यारीत असलेले संरक्षण, दळण वळण व परराष्ट्र खाते यावर आजवर त्यांचे नसलेले नियंत्रण पुन्हा मिळवता येईल अशी खबरदारी घेतली. 

आता आपण जाणून घेऊ, जनतेचे मतदर्शन व सैन्याच्या कृती-

1) जुनागढ - जुनागढ येथील मुस्लिम नवाबास पाकिस्तान मध्ये समाविष्ट व्हयाचे होते. परंतु जुनागढ येथील हिंदू बहुसंख्याांक नागरिकांना भारतात यायचे होते. शेवटी जुनागढ १९४८ मध्ये भारतात समाविष्ट झाले.

2) हैदराबाद संस्थानास सार्वभौम दर्जा हवा होता. भारतासोबत नोव्हेंबर १९४७ मध्ये या संस्थानचा स्तब्ध करार झाला. भारताने आपले सैन्य हैदराबाद संस्थांतून काढून घेतले व निझामांच्या पोलिसांनी सर्व नियंत्रण स्वतः कडे घेतले पुन्हा १९४८ मध्ये भारताने आपले सैन्य हैदराबाद येथे पाठवले आणि शेवटी १९४९ च्या नोव्हेंबर मध्ये हैदराबाद भारतात विलीन झाले.

3) काश्मिर - काश्मिर राज्याचे राजा हे हिंदू धर्माचे होते. परंतु मुस्लिम लोकसंख्या अधिक होती. काश्मिरचे राजा हरिसिंग यांनी भारत पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये न जाता स्वतः चे राज्य स्वंतत्र ठेवण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने सैन्य पाठविल्यानंतर ऑक्टोबर १९४७ मध्ये Instrument of accession वर सह्या करण्यात आल्या. शेख अब्दुला यांनी भारत व काश्मिर यांच्यातील या कराराला सहमती दर्शवली होती. भारताने पाकिस्तानी सैन्याशी लढण्यासाठी आपले सैन्य पाठवले. युनायटेड नेशन मध्ये नेहरूंनी हा खटला नेला व जनमतानुसार या संघर्षाला विराम देण्यात आला. पण 84 चौरस किमी इतके क्षेत्रफळ असलेला भूभाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला. ह्या नाजूक स्थितीत भारतात समविष्ट झालेल्या काश्मीरला कलम 370 अंतर्गत भारताच्या सविधनात संरक्षण देण्यात आले. अशा पद्धतीने 216 छोटी राज्ये त्यांच्याशी संलग्न अशा प्रदेशांमध्ये समाविष्ट करण्यात आली व त्यांना भाग अ मधील राज्ये असे म्हटले गेले. ६१ राज्ये भाग ब मध्ये टाकण्यात आली.

India After Independence in Marathi Part 2

 १९५६ साली सातव्या घटना दुरुस्तीने भाग ब काढून टाकण्यात आला अशा रीतीने भारतीय राज्ये एकरूप राजकीय व्यवस्थेचे भाग बनले.

आता आपण समजून घेऊ, संविधान निर्मिती.

 २६ जानेवारी १९५० रोजी अंमलबजावणी झालेले भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे संविधान आहे. भारतासारख्या आत्यंतिक विविधतेने नटलेल्या देशाला एकतेत बांधून ठेवण्याचे काम तसेच लोकशाही विषयक मूल्ये जपण्याचे काम संविधान निर्मात्यांनी केले. भारत स्वतंत्र होईपर्यंत प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी संविधान सभेत होते. १४ &१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री संविधान सभेकडे संपूर्ण अधिकार आले. ही संविधान सभाच आता भारताचे विधिमंडळ होती. भारत सरकारच्या १९४७ च्या कायद्यातील सेक्शन ८ नुसार हे अधिकार प्रदान करण्यात आले होते. राज्याचे प्रतिनिधी प्रत्यक्ष मतदानाने निवडून आलेले नव्हते. १९३५ च्या कायद्यानुसार कर, संपत्ती आणि शिक्षणानुसर मतदान करता येणार होते. ज्यामुळे ७७% नागरिक मतदानापासून वंचित राहिले असते. संविधान सभेत भारताच्या विविधतेप्रमाणेच सर्वच विचारांचे प्रतिनिधी होते. जसे की मार्क्सवादी, समाजवादी, लोकशाही मुल्यांना जपणारे ई. या सर्वच विचारांचा प्रभाव सविंधानावर झालेला दिसून येतो. यात सर्वाधिक उदारमतवादी , लोकशाही, व समाजवादी विचारांना स्वीकृती दिल्याचे आढळते. सविंधान पाच पायऱ्यांमध्ये बनलेले आपल्याला दिसून येईल. पहिल्या पायरीत समिंत्याची गरज होती. ज्या मूलभूत मुद्द्यांवर अहवाल देणार होत्या. दुसऱ्या पायरी मध्ये बेनेगल नरसिंह राव अर्थात B.N Rau जे कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते व संविधान सभेचे सल्लागार होते. त्यांनी पहिल्या पायारीतील समित्यांच्या अहवालानुसार मसुदा बनविला , याशिवाय त्यांनी इतर देशांच्या संविधानाचा देखील अभ्यास केला होता. तिसऱ्या पायारीत भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने संविधानाचा सखोल मसुदा बनविला, जो नंतर सल्यासाठी सर्वांसमोर मांडण्यात आला. चौथ्या पायरीत मसुदेवर वादविवाद झाले. व दुरुस्ती सुचविण्यात आल्या. पाचव्या पायरीत भारताचे संविधान स्विकारले गेले.

संविधान समित्यांच्या अहवालानुसार बी एन राऊ यांनी ऑक्टोबर १९४७ च्या शेवटी सविंधानाचा मसुदा सादर केला. या मसुद्यात २४० कलमे आणि १३ परिशिष्टे होती. या मसुद्याच्या परीक्षणासाठीच डॉ आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या पहिल्या नमुण्यानंतर तो नमुना विधी तज्ज्ञ, वकील, न्यायाधीश इ. मध्ये सूचनांसाठी वाटण्यात आला. या सल्ला आणि सूचनानंतर दुसरा मसुदा ३१५ कलमे व ९ परिशिष्टांसोबत बनला. हा दुसरा मसुदा २१ फेब्रूवारी १९४८ रोजी संविधान सभेत मांडण्यात आला. तिसरे वाचन १४ नोव्हेंबर १९४९ला सुरू करून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संपले. सगळ्यात शेवटी प्रस्तावना स्वीकारण्यात आली. संविधानाच्या या संपूर्ण प्रक्रियेला २ वर्ष ११ महिने व १८ दिवस इतका कालावधी लागला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी तमाम भारतीय जनतेच्या रूपाने संविधान सभेत बसलेल्या प्रतिनिधींनी डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संविधानाचा स्वीकार केला.

       २४ जानेवारी १९५० हा संविधान सभेचा शेवटचा दिवस होता. याच दिवशी सभेतील २८४ प्रतिनिधीनी संविधानावर आपल्या सह्या केल्या. हा तोच दिवस होता, ज्या दिवशी राष्ट्रीय गीत व राष्ट्रगीत दोघे स्वीकारले गेले. ह्याच दिवशी भारताचे राष्ट्रपती म्हणून राजेन्द् प्रसाद निवडले गेले. २२ जुलै १९५० रोजी राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आले. २६ जानेवारी १९५० पासून संविधान सभा ज्यास विधी मंडळ देखील म्हटले गेले. ते आता संसदेचे कामकाज करण्यास सज्ज झाले होते. नवीन सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत हे कामकाज असेच चालणार होते. संविधान & सरकार या दोघांमध्ये आपल्या प्रभुत्ववाने मोहोर उमटविणारे ४ नेते म्हणजे नेहरू, पटेल, राजेंद्र प्रसाद & अबुल कलाम आझाद हे होय. असे मत अमेरिकी इतिहासकार ग्रॅनविल ऑस्टिन यांनी दिले.

      संविधान निर्मिती नंतर आपण समजून घेऊ, भारताचे राष्ट्रीय परराष्ट्र धोरण- स्वातंत्र्याच्यावेळी भारत ५१ आंतरराष्ट्रीय संस्थानांचा सदस्य होता. ६०० करारावर भारताने सह्या केल्या होत्या. स्वांतत्र्यापूर्वी पासूनच हे सर्व घडत होते या प्रक्रियेत नेहरूंनी काही देशांना भेटी देऊन महत्वाचे कार्य पार पाडले होते. ह्याचाच फायदा त्यांना आधुनिक भारताच्या बांधणीत झाला. १९४७ च्या डिसेंबर ४ रोजी त्यांनी संविधान सभेत सांगितले की, देशांचे परराष्ट्र धोरण अशाच पद्धतीचे हवे ज्याने राष्ट्राला कोणताच धक्का पोहोचता कामा नये. भारताने कोणत्याही परिस्थितीत इतर कोणत्याच संस्था अथवा देशावर अवलंबून असता कमा नये. यानंतर नेहरूंनी पंचशील व NAM ह्या दोन मूलभूत धोरणावर भारताची परराष्ट्र निती आखली. आपण भारत चीन संबंध या भागात जाणून घेतले होते २९ एप्रिल १९५४ रोजी पंचशील तिबेट आणि भारतात स्पष्टपणे योजले गेले.


 'शील' हा बोद्ध धर्मात वापरला गेलेला शब्द इंडोनेशिया या देशात मोठ्या प्रमाणात वापरला जात असल्याचे आपणास समजून येते.

जगात स्वतःचे सत्ता सामर्थ्य दाखविण्याच्या शर्यतीत दोन भाग पडले. पण नेहरूंच्या प्रतिनिधित्वाखालील भारताने कोणत्याच गटात सामील न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच NAM ही चळवळ महत्वाची ठरते. या नॉन अलाईनमेंट मुव्हमेन्ट चे पहिले पाच नेते जाणून घेऊ - युगोस्लाव्हिया चे टिटो ज्यांचे मूळ नाव जोसिप ब्रोझ हे होय, इजिप्तचे राष्ट्रध्यक्ष गमाल अब्देल नसार, धाना चे राष्ट्रध्यक्ष वामे क्रमाह, इंडोनेशियाचे राष्ट्रध्यक्ष सुकाणोऀ आणि यासर्वांसोबत NAM ला प्राधान्य देणारे पाचवे नेते होते भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू.

      संविधान निर्मिती आपण जाणून घेतली. २६ जानेवारी १९५० रोजी संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. परंतु , २९ नोव्हेंबर रोजी नागरिकत्व व कलम ३२४ अर्थात निवडणूक आयोग यांची अंमलबजावणी सुरू झाली होती . ५ जानेवारी १९५० रोजी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे होय. सुकुमार सेन हे इंडीयन सिव्हील सर्व्हिसेस मध्ये अधिकारी होते. २१ मार्च १९५० रोजी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.

यानंतर येते ती भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक.. या अखंडप्राय देशाची निवडणूक प्रक्रियाही तितकीच रोचक असणार यात शंका नाही. तेव्हा पुढील भागात जाणून घेऊ भारतातील १९५१-५२ या सालातील पहिल्या वहिल्या सार्वत्रिक निवडणुकांविषयी.. 

धन्यवाद !!!


स्वातंत्र्यानंतरचा भारत पहिला भाग - https://www.exploringsrijan.com/2020/11/blog-post.html?m=1

स्वातंत्र्यानंतरचा भारत दुसरा भाग - https://www.exploringsrijan.com/2021/01/blog-post_22.html?m=1

स्वातंत्र्यानंतरचा भारत भाग ३  https://www.exploringsrijan.com/2021/02/blog-post.html

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine