आदिवासी संस्कृती , महिला आणि आपण | Adiwasi Culture Women's & We All

आदिवासी संस्कृती , महिला आणि आपण | Adiwasi Culture Women's & We All 

 २०१०- ११ साली प्रकाश आमटे सकाळ सप्तरंग मध्ये लेख लिहायचे. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, आदिवासी त्यांच्या स्त्रियांना इतर कोणत्याही समाजातील स्त्री पेक्षा जास्त किंमत देतात. (बलात्काराला संस्कृती नसते, त्यासाठी खास बाई नावाचा समाज पुरेसा असतो). 

Adiwasi Culture Women's & We All
Adiwasi Culture Women's & We All 



Adiwasi Culture Women's & We All 

     तर, हळदी कुंकवाच्या फालतू कार्यक्रमाला संस्कृती म्हणण्याचं धाडस माझ्याच्याने तरी होणार नाही. संस्कृतीत बाईला गुंडाळणं सोप्पं असतं. पुरुषाने यावं नोकरीवरून घरी.. घालावं धोतर किंवा पायजमा.. आणि द्याव्या इतर पुरुषांना पौरूषेय बिनकामाच्या वस्तू.. तुझी बायको जिवंत आहे म्हणून तुला गुलाल लावतो, टोपी घालतो, मफलर किंवा शाल देतो . करावे असे उद्योग.. पण ते याला नकार देतील.. त्या ऐवजी ते टिव्ही वर मॅच बघणं प्रेफर करतील. किंवा त्याच पुरुषांसोबत जगाच्या राजकारणाविषयीच्या गप्पा आणि चर्चा सत्र सुरू करतील. बाई मात्र मी होते म्हणून राहिले नाहीतर कधीच फारकती घेतली असती असं ज्याच्यासाठी आयुष्यभर म्हणत राहते, त्याच्याचसाठी आजन्म सगळी उठाठेव करते. उगीच नाही बाई, तमाम संस्कृतींनी तुला येड्यात काढलं ..


     चला, आवरतं घेते.. मला हळदी कुंकवाला जाण्याची तयारी करायची आहे.. 

 

स्वातंत्र्यानंतरचा भारत पहिला भाग - https://www.exploringsrijan.com/2020/11/blog-post.html?m=1

स्वातंत्र्यानंतरचा भारत दुसरा भाग - https://www.exploringsrijan.com/2021/01/blog-post_22.html?m=1

स्वातंत्र्यानंतरचा भारत भाग ३  https://www.exploringsrijan.com/2021/02/blog-post.html

Comments

  1. प्रखर लिहिलंस.. बाई बाई म्हणून जन्माला येत नसते तिला इथली व्यवस्था बाई बनवते...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine