आपल्या नकळत आपण खूप phases जगत असतो. त्यातली एक phase म्हणजे मी कधीच लग्न नाही करणार.. मग आपल्या आजूबाजूचे म्हणणार- सगळे असेच बोलतात.
ही फेज फार काळ टिकू नये, म्हणून जसं काही एखादी व्यक्ती आयुष्यात येते. जिच्यामुळे आपण हे सर्व विचार सोडून देतो.
ती एक अशी व्यक्ती असते, जी आपल्या डोक्यातल्या इतर विचारांसोबतच आपलाही आदर करत असते. ही तिच व्यक्ती असते, जिच्या मुळे आपण कधी न पाहिलेले स्वप्नही पाहायला लागतो.
सोबत राहणं ह्या दोन शब्दांखातर अख्खं आयुष्य ह्याच शब्दांना देऊन टाकतो. मग ते लग्न असो की आणखी काही आऊटपुट मात्र फक्त सहवासाचा हवा असतो. आपला सभोवताल आपल्या स्वप्नांना सकारात्मक आसक्ती देऊन जातो. जसं की, इथला सिनेमा, इतरांचे अनुभव ह्या सगळ्यामुळे मनाशी बाधलेली गाठ अधिक घट्ट होते. आणि परिक्षा पास होत नसले तरी हा निकाल माझ्याच बाजूने लागणार असा शेरा मन देऊन टाकतं.
स्वप्नांत खूप ताकद असते असं मी वेगळं म्हणायची गरज नाही. कारण ते पूर्ण झालं की, त्याच्या चांगल्या वाईट परिणामांची काळजी उरत नाही. आपलं मन त्या स्वप्नांच्या पूर्ततेतच इतकं विसावलेलं असतं की त्याला लागणारया उन्हाची झळ बसतच नाही. (पण म्हणून अर्थहीन स्वप्न पाहून स्वतः च उन्हं डोक्यावर घेण्याची गरज नाही.)
आपल्या स्वप्नातल्या व्यक्ती सोबत आयुष्य जगणं म्हणजे वेगळं काही नसतं, असतो तो फक्त निखळ आनंद.आणि आपलं आयुष्य आपल्याकडे वेगळं काही मागत नसतं. ज्या व्यक्तीचा कधी विचारच केला नसेल, त्या व्यक्ती सोबत राहणं म्हणजे उगीच नसत्या गोष्टी सुद्धा खटकू शकतात पण हव्या त्या व्यक्ती सोबत राहतांना मात्र खटकणं हा शब्दच आपण विसरून जातो.
खरंतर आपली स्वप्ने ऐवढी कमजोर नसतात की, ती जगणं समोरच्याच्या स्वाधीन करतील, आणि सुखाला परकं करतील. अर्थात हे परिपक्व मना बद्दल झालं. अपरिपक्व ते परिपक्व आणि वय चांगलं पक्कं होईपर्यंत एकाच माणसाची साथ मिळाली तर? एक असा माणूस, जो कधी अपरिपक्व वाटलाच नाही? कदाचित तो असणार.. पण आपल्या वयाला किंवा मनाला ते समजत नसणार. आणि स्वतः पेक्षा ही व्यक्ती प्रगल्भ असली तर कधीच अपरिपक्वता कळून येत नाही. ह्या प्रवासात आपल्या हककाच्या माणसा सोबत खूप भांडणं होतात. पण दोघांचे स्वभाव सर्व काही तारून नेतात. नंतर तर भांडणं अगदी नगण्य उरतात. किंवा त्यांची सवय होत असावी किंवा काहीही झालं तरी आता एकमेकांशिवाय जगणं शक्य नाही, ही जाणीव होत असावी. ज्यामुळे भांडणांना नगण्यता प्राप्त होते.मग अशा वेळी का ह्या व्यक्ती सोबत राहण्याची आसक्ती नाही होणार?
जेव्हा लग्न करून हे स्वप्न पूर्ण होत असतं तेव्हा ही व्यक्ती सगळं बदललंय याची जाणीव किंवा भान ठेऊनच वागते. आपल्याला मदत करायला तत्पर असते. तू आवडणं हे वर्षागणिक वाढत गेलेलं समीकरण आता आणखी बॅलन्स होतंय . तू उगीचच आवडता नाहीये. मम्मी पप्पांमुळे तू असाये. किती मदत करतात ते मला. जिथे की मी स्वतः ला नेहमी काटक समजते. पण मी आयुष्यभर काटक राहू शकेल कारण, माझं आजच डीग्रेडेशन नाही होणार. प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं, आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू बघणं. आज माझ्या चेहऱ्यावर हसू बघून ते खूश आहेत. मी आजकालच्या मुलींसारखं स्वतंत्र विचार बाळगले, ते विचार मला जगता येत आहेत म्हणून मी खूश आहे. सुजित आणि मी कर्तव्य सोडून वागत नाही म्हणून मम्मी पप्पा खूश आहेत. आणि माझ्या स्वप्नाला (सुजितला) माझ्या सोबत राहण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याची खुशी आहे. हा सर्व खुशीचा नजारा पाहण्याचा आनंद आमच्या प्रत्येक भावा बहिणीने, मित्र मैत्रिणीने घेतला. हे सर्व शक्य होऊ शकलं ते फक्त एका स्वप्न पूर्तीने..
शेवटी, सकारात्मक स्वप्ने पाहिली की, आयुष्य सुद्धा त्यांच्या पूर्तीने पूर्ण होऊन जातं.
❤️❤️❤️
ReplyDelete😘😘
Delete👌😘😘😘😘
ReplyDelete♥️♥️♥️
DeletePyar pyar pyar❤️
ReplyDelete😊♥️
Delete😘♥️♥️♥️
ReplyDeleteFufata ♥️
Deletemst didu ♥♥
ReplyDeleteThanks tau
Delete