मिनल भावना


काही लोकांना आपण मोजता येईल इतपत भेटलेलो असतो आणि तितकंच बोललेलो असतो. पण या सगळ्यात त्यांच्याशी जे बॉन्ड शेयर करतो , ते खरंच खूप सुंदर असतात. मग अशा वेळी एखाद्या विचित्र कारणासाठी जर त्यांच्या पासून ताटातूट झाली तर चूक कोणाचीही असो पण आपलंच मन स्वतःला अपराधी मानतं. इकडे भावना जड झालेल्या असल्या तरी त्यांच्या कडे काय चालू ए, हे मात्र माहीत नसतं. ते आपलं ऐकायला नसले तरी सांगावेसे वाटते की, "आलेली कठीण वेळ सांभाळायला तू समर्थ आहेस. जी गोष्ट तुला हवी होती पण मिळाली नाही, त्या गोष्टीलाच कदाचित तेवढी योग्यता नसणार. आणि तुझी योग्यता मात्र ह्या सगळ्या गोष्टींच्या खूप पुढे आहे." आपल्या आयुष्यात असे धुमकेतू सारखे येऊन निघून जाणारया लोकांना एकच सांगणे- यशस्वी व्हा, जमल्यास सतत डोळ्यासमोर येणं बंद करा. म्हणजे भावना जड होणं थांबतील. कारण पुन्हा कधी संपर्क होणार असतो आणि कशी ह्या लोकांची खुशाली कळणार असते?

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine