बबन


      हीरो जेव्हा महागड़या बाइक्स, कार्स घेऊन पडदयावर येतो तेव्हा आपली करमणूक होत असते पण त्या ऐवजी दुधाची can भरून त्याने जर M 80 गाड़ी स्टार्ट केली आणि attitude दिला तर ते सरळ हृदयाला भिडलेलं असतं. कारण असं नैसर्गिक दाखवलेल्या गोष्टींचा वास्तवाशी जवळचा संबंध असतो. हीरोने आपल्या स्वप्नातल्या राणीबद्दल फिल्मी भाषेत बोललेलं प्रेक्षक नेहमी पाहतात पण 'कुठं तर्फडली होती कायनू' असं त्याच्या तोंडून ऐकणं म्हणजे अत्युच्च गुदगुदल्या होत्या.. सामान्यतः हीरोचा बाप एकतर कॉमेडी, एकतर गंभीर, किंवा एखाद्या ठरलेल्या साच्यातला असतो पण इथे आख्ख्या सिनेमाचा भाव एकटा बापच घेऊन जातो आणि आपण दिग्दर्शका सोबत उत्कृष्ट नट देखील असल्याची जाणीव करून देतो. शब्द, डायलॉग, गाणी काय सांगतील अशा पद्धतीने नुसत्या अश्रु मधून भावना व्यक्त करायची किमया बबन च्या आईने करून दाखवलीये.. सामाजिक सिनेमा करताना वाद उद्भवतो कारण त्यात जात, धर्म इ.चा कुठेतरी परामर्श झालेला असतो पण इथे स्वतः च्या स्वप्नांसाठी लढणाऱ्या युवकाची कहानी मांडली असल्यामुळे आता कोणाशी वाद घालावा हा प्रश्न समाजात दुही निर्माण करणाऱ्यांना पडू शकतो. राजकारण असो की गावगाडा असो मुलीच्या आयुष्याची राख रांगोळी केल्याविना समाजाला चैन पडत नाही हेच खरे..! बबनच्या चेहऱ्यावरचे हास्य, सर्वांचाच कॉलेज मधील वावर, अभय आणि देवेन्द्र हे दोन खलनायक, गावाचे खुपच वास्तववादी दर्शन ह्या सिनेमाच्या जमेच्या बाजू आहेत. डॉ. विनायक पवार आणि सुहास मुंडे यांनी लिहीलेली गाणी, ओमकार स्वरुप यांचा आवाज, गुनगुणत रहावं असं संगीत बबन पाहून आल्यानंतर लवकर डोक्यातून जात नाही. काही तांत्रिक गोष्टी आणि बबनच्या पिल्लू ची फारशी न पडलेली छाप सोडून सिनेमा एकदा तरी पहावा असाच आहे. 

Comments

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine