शिक्षण ही खुप मौल्यवान गोष्ट आहे. देशाची बाजू कमकूवत करणारी महत्वाची गोष्ट शिक्षणपद्धती आहे. आपल्याकडे D.Ed, B.Ed ऑप्शन म्हणून केलं जातं. पण प्रगत समाजात शिक्षक होणं अवघड आणि तितकंच मानाचं आहे. खरंतर असलंच पाहिजे. कारण, शिक्षणा मूळे एक अख्खी पिढी घडणार असते. मात्र असं काहीही होत नाहीये. शिकवलेल्या किती गोष्टींच पालन केल जातं हे आत्मपरिक्षणातून दिसून येईल. व्यक्तिमत्व विकास, नागरिक शास्त्र, पर्यावरण यासारखे अनेक विषय एक सुजाण नागरिक होण्याचं स्वप्न आपल्याला दाखवत असतात आणि तरीही आपल्याला फ़क्त गलेलठ्ठ पगारासाठी शिकणे हेच वास्तवात आणायच असतं. ईथे घडणारा अधिकारी देखील नियम बाळगत नाही,डॉक्टर्स सेवा कमी अन् बाजाराच्या हॉस्पिटल मध्ये जास्त दिसतात, राजकारण आणि शिक्षण तर सवतीं प्रमाणे आहेत. शिक्षण हे एक मूल्य आहे, संपत्ती सारखं ते जोपासलं गेलं पाहिजे. आपलं राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष आहे-असं शाळेच्या पुस्तकाच्यापहिल्या पानापासून वाचत आलोय तरी स्वतःचाच धर्म मोठा ही बाहेरच्या शाळेतून मिळणारी शिकवणच सगळ्यात मह्त्वाची वाटते. एक माणूस घडवायला मूल्यशिक्षणाचा फार मोठा वाटा असतो. पण तो मार्क्स मिळवून देणारा विषय नसल्याने त्यात शिकवलेलं सविस्तर विसरलं जातं. पाणी बचत, वीज बचत, स्वच्छता, माणुसकी ह्या बाबी तर पानाच्या शेवटी सुविचारांगत लिहायची वेळ आलीये. ट्राफिक चे नियम तर त्रास असतो, ते आपल्या भल्या साठी असतात हे खिजगिणतीतही नसतं.याउपर नियम हे तोडण्यासाठीच असतात असं घाणेरडं वाक्य वापरून अशिक्षितपणाचं मस्त प्रदर्शन रोजच दिसतं. हे घडण्याच् कारण- गुणांवर चालणारी शिक्षणपद्धती हे आहे. यामुुळे खेळ, कला ह्या आयुष्य बदलवून टाकणाऱ्या गुणांची गोची होते. मूल्यांची जड़ण घडण न झाल्याने भ्रष्टाचार बोकाळलाय. पुरातन काळ आणि एकविसावे शतक यात काहीच अंतर न ठेवणारी अंधश्रद्धा आजच्या सुशिक्षित काळातही विज्ञानाचा जीव घेतेय.
शिकून कितीही शास्त्रीय कारणे मिळवली तरी पुरातन वागणूक बदलत नाही. अभ्यासक्रमाने कितीही महापुरुषांचे कर्तुत्व सांगितले तरी त्यांचा आदर्श घेण्या त्यावर वादविवादच करायचे हे व्यवस्थेकडून शिकलेलेच जास्त महनीय झालंय. शैक्षणिक गुणांवर सगळ अवलंबून असल की व्यवहार ज्ञान जोपासणार्यांचं स्थान दुय्यम होत जातं. मुले फूलं आहेत असं म्हटलंच जातं तर त्यांच्यावर दप्तराच ओझ लादण्या ऐवजी, मूल्यांच्या फूलांनी त्यांच जीवन बहरायला हवं.समाजाचं प्रतिनिधीत्व येणाऱ्या पिढीच्या हातात आहे. ती नैतिकतेने फूललीच पाहिजे. कागद, जीवन असं सगळीकडेच शिक्षण उमटायला हवं. स्वतःला बाजारीकरणाचा भाग बनवून चालणार नाही. माणसाच्या आतला ज्ञानार्थी ओळखता आला पाहिजे, तो घडवता आला पाहिजे.
✌👌
ReplyDelete😊👍
Delete