'नव्या युगातील कवी'

मूळच्या हिंदी कवितेचा मराठी अनुवाद केलाय.

'नव्या युगातील कवी'


नव्या युगातील कवीने माचिस ची काडी जाळली
आणि जोर जोराने ओरडायला सुरुवात केली- 'मशाल मशाल'.
पण बघितलं तर,
त्या कवीच्या हातात एक विझलेली छोटीशी आगकाड़ी आहे. धुराची एक छोटीशी, खुपच छोटी रेष त्या आगकाडी वर बाष्पासारखी दिसतेय.
असं मानलं गेलं की,
कवी कुठून तरी मशाल पेटवून येत आहे.
पण कुठे? असं कधीतरी विचारलच जाईल,
हे तर कवी नीट जाणतच असणार-

पण सध्या, त्याला इतकं काम करून थकल्या मुळे थोडा आराम करू देऊ..
नंतर कवींचा 'मशाल मशाल' असा ओरडण्याचा आवाज काळाच्या पाठीवर नोंदला गेला..
त्या वेळी जेव्हा केव्हा कवींकड़े पाहिलं गेलं तेव्हा त्यांच्या हातात विझलेली आगकाडी आणि त्यातून निघणारा धूर दिसला..
मानलं की,
खुप सारी मशालं जळलीये.. ईथे.. तिथे..
पण कुठे? हे सांगणं जरा कठीण होतं..
पण कवींवर संशय घेणेही कठीण होतं..
आणि ह्या कृत्याला घोर अनैतिक असेही म्हटले जायचे..
पण कवी ने म्हटलयं तर मानलं गेलं की, मशाल तर जळलीच असणार., त्या मशालीच्या तेजाचा फायदा कोणी ना कोणी घेतलाच असणार..
आता हळू हळू विझणाऱ्या आगकाडयांना मशाल म्हणणं अगत्याच् होउ लागलं..
एक दिवस, एका छोट्या मुलाच्या बोबड्या आवाजात ऐकू आलं- 'मशाल मशाल'
मग मानलं गेलं की, कुठेतरी विझतेय धुरमय आगकाडी किंवा कवीने फेकलेल्या आगकाडी सोबत कोणी लहानगा खेळत असणार.
परंतू त्या बोबडया आवाजा नंतर जेव्हा थोडासा उजेड दिसू लागला, तेव्हा तळ हाताच्या बळावर काळ उभा राहिलेला दिसला.
मग कळालं, की त्या लहानग्याच्या हातात शब्दकोशाची मशाल पेटतेय..
दिसलं की,
त्या लहानग्याने, कवीने फेकलेल्या काडयांना एकत्र करून खरचं त्यापासून मशाल बनवलीये..
आणि मग त्या उजेडात दिसले- आत्ताचे कवी....
आपल्या हाताने स्वतःचा चेहरा लपवितांना..
तुम्ही नाही पाहिलतं?
मग थांबा..
त्या बोबडया शब्दांसाठी..
-पुष्पेन्द्र फाल्गुन.

अनुवाद- तेजल एस. डी.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यश आणि स्वप्न

पायवाट

Dopamine